लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतरच्या महिनाभरात मृत्युदर विदर्भात सर्वाधिक होता. त्यानंतर मात्र यात सातत्याने घट झाली आहे. १३ टक्क्यांवर गेलेले मृत्यूचे प्रमाण आता पाच टक्क्यावर स्थिरावले आहे. दोन महिन्यात १६ व त्यानंतर मात्र एका मृत्यूची भर पडली. सद्यस्थितीत आतापर्यंत आढळलेल्या ३४३ कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत १७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. मृत्यूपश्चात या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या प्रतिबंधित क्षेत्रात सहा व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या सर्व होम डेथ आहेत. मृत्यूपश्चात स्वॅब घेण्यात आल्यानंतर या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सुरुवातीच्या काळात या क्लस्टरमध्ये कोरोनाचा शिरकाव जोराने झाला. अनेक आजारी व्यक्तींची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळेपर्यंत त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. किंबहुना सुरुवातीचे कोरोनाग्रस्तांचे मृत्यू हे होमडेथ होते. त्यानंतर आरोग्य यंत्रणाद्वारे जागृती, पथकांकडून सर्वेक्षण आदी माध्यमांतून यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण मिळविले आहे. अन्य जिल्ह्यांत होमडेथचे स्वॅब न घेता त्या कुटुंबांतील अतिजोखमीच्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येते व हाच फॉर्म्यूला आरोग्य यंत्रणाद्वारे जिल्ह्यात वापरण्यात आला. क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये नागरिकांमध्येही जागृती होऊन आजारी व्यक्तींची माहिती आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचू लागल्याने त्यांच्यावर उपचारदेखील व्हायला लागले आहेत. यामध्ये पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची राहिली आहे. व्हेंटिलेटर, आॅक्सीजन बेडची मुबलक संख्या असल्याने रुग्णांवर योग्य उपचार होऊन जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्युदरात अलीकडे मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.नागरिकांची इच्छाशक्ती, आरोग्य यंत्रणाद्वारे होत असलेल्या प्रयत्नांचा हा परिपाक आहे. सुरुवातीला काही होम डेथ झाल्यात. आता नागरिकांचेदेखील चांगले सहकार्य मिळत असल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीआरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर व सर्व टीम तसेच जिल्हाधिकारी व सर्व यंत्रणेच्या अमूल्य सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. आरोग्य यंत्रणेच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.- डॉ. श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक
संक्रमितांच्या मृत्युदरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST
जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. मृत्यूपश्चात या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या प्रतिबंधित क्षेत्रात सहा व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या सर्व होम डेथ आहेत. मृत्यूपश्चात स्वॅब घेण्यात आल्यानंतर या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सुरुवातीच्या काळात या क्लस्टरमध्ये कोरोनाचा शिरकाव जोराने झाला.
संक्रमितांच्या मृत्युदरात घट
ठळक मुद्देपाच टक्क्यांवर स्थिरावला : ७३ दिवसांत १७ बाधितांचा मृत्यू, सात 'होमडेथ'