आचासंहितेचा फटका : पंचायत समितीत धूळ खातचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिन्यात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळेच बैलबंड्या वाटपाची प्रक्रिया रखडली असून सध्या शेकडो बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारातच धूळ खात पडल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलबंडी वाटप केली जाते. ९० टक्के राज्य शासन, तर १० टक्के लाभार्थ्यांना भराव्या लागतात. बैलबंड्या मिळविण्याची पद्धत साधीसोपी आहे. अनुदानी ९० टक्के मिळत असल्याने गेल्या काही वर्षापासून समाजकल्याण विभागाच्या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. २०१४-१५ या सत्रासाठी समाजकल्याण विभागाने अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून बैलबंड्यासाठी अर्ज मागविले होते. शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. त्यातून ३०९ लाभार्थी पात्र ठरले. ही प्रक्रिया मार्च, एप्रिल महिन्यात पार पडली. बैलबंड्या आल्यावर त्यांचे वितरण पंचायत समितीस्तरावर होणार होते. मात्र, याचा कालावधी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जून महिन्यात आचारसंहिता लागली. आचारसंहितेत साहित्याचे वाटप करता येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या या बैलबंड्या पंचायत समितीच्या आवारात धूळखात पडल्या.खरिपाच्या हंगामात बैलबंड्या मिळतील, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, अजूनही या बैलबंड्याचे वाटप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्याचा दौरा केला. त्यात त्यांना या बैलबंड्या ठिकठिकाणी पडून दिसल्या. त्यांनी त्या वाटप करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही त्यांना वितरीत केल्या नाहीत. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतसाहित्य वाटप करण्यात दिरंगाई
By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST