शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो निधीतून उपायुक्तांची विमानवारी, वित्त विभागाचा निर्णय गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 16:55 IST

विभागीय आयुक्तांच्या रोहयो कार्यालयाच्या उपायुक्तांनी नियमबाह्य विमानवारी करून निधीची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमरावती : येथील विभागीय आयुक्तांच्या रोहयो कार्यालयाच्या उपायुक्तांनी नियमबाह्य विमानवारी करून निधीची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रोहयोचा निधी विकासकामांसाठी की अधिकाऱ्यांच्या मौजमजेसाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. पुणे ते नागपूर विमान प्रवासाचे नियमबाह्य बिलदेखील काढण्यात आल्याची माहिती आहे. 

वित्त विभागाच्या २१ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयानुसार, जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी यांनाच विमानप्रवास सवलत अनुज्ञेय केली आहे. तथापि, अन्य अधिकाऱ्यांना तातडीने मिटिंग अथवा महत्त्वाच्या कामासाठी विमानाने जायचे असल्यास तत्पूर्वी नियोजन विभागाच्या सचिवांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. किंबहुना नियोजन सचिवांनी परवानगी दिल्यास संबंधित अधिकाºयांना ये-जा करण्यासाठी इकॉनॉमी क्लासने विमानप्रवास अनुज्ञेय राहील, असे शासन आदेशात नमूद आहे. मात्र, अमरावती विभागीय आयुक्तांच्या रोहयो कार्यालयाचे उपायुक्त शहाजी पवार यांनी नियोजन विभागाच्या सचिवांची पूर्वपरवानगी न घेता ७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुणे ते नागपूर विमानप्रवास केला आहे. एनबीकेओवायव्ही २८३ क्रमांकाच्या फ्लाईटने उपायुक्त पवार यांनी इकॉनॉमी क्लासने विमानवारी केली असून, १६ हजार ८६२ रूपयांचे प्रवास बिल १२ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजूरदेखील करून घेतले आहे, हे विशेष. त्यामुळे रोहयो निधीची संबंधित अधिकारी कशी वाट लावतात, हे यावरून स्पष्ट होते. राज्य शासनाने रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ ग्रामीण भागात मजुरांना वर्षभर रोजगाराचे साधन उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने रोवली आहे. मात्र, रोहयो अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या यंत्रणांच्या अपहार प्रवृत्तीने या योजनेचा मूळ आत्माच बदलून गेल्याचे वास्तव पुढे येत आहे. विभागीय आयुक्तांना अंधारात ठेवून बिल मंजूररोहयो उपायुक्त शहाजी पवार यांनी पुणे ते नागपूर विमानप्रवासाचे बिल मंजूर करून घेताना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना अंधारात ठेवल्याची बाब समोर आली आहे. विमानवारीचे बिल रोहयोच्या प्रशासकीय खर्चातून कोषागार कार्यालय मान्य करणार नाही, हे पवार यांना चांगलेच अवगत होते. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ६ टक्के निधीतून १६ हजार ८६२ रूपयांचे बिल काढण्यात उपायुक्त पवार यशस्वी झाले आहे. फाईलवर विभागीय आयुक्तांची स्वाक्षरी  करून हे बिल मंजूर केले आहे.