शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

अनुसूचित जमाती हक्कासाठी शासन निर्णय काढा

By admin | Updated: February 22, 2016 00:43 IST

राज्यातील २५ ते ३० अनुुसूचित जमातीवर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या दालनात आ. रवी राणा यांच्या नेतृत्वात ...

कृती समितीची मागणी : आदिवासी विकासमंत्र्यांसोबत बैठकअमरावती : राज्यातील २५ ते ३० अनुुसूचित जमातीवर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या दालनात आ. रवी राणा यांच्या नेतृत्वात अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी अन्यायग्रस्त मागावर्गीय कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत अनुसूचित जमाती मधील हलबा, हलबी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे, कोळी, धनवर, ठाकूर, ठाकर, माना, मनेवार, मनेरवालू , छत्री, गोड गवारी मनेकवार, धोबा, धनगड, बिंजवार, इंजवार आदी अनुुसूचित जमातीवर अनेक वर्षांपासून अन्यायग्रस्त मागासवर्गीय कृती समितीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र यावर कुठलाही निर्णय होत नसल्याने कृती समितीने आंदोलनेही केलीत. परंतु त्यांतरही अन्याय दूर झाला नाही. त्यामुळे शासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र तपासणीसाठी मागू नयेत, जाती, जमातीचा विषय हा भारत सरकारच्या अखत्यारित आहे. त्यानुसार राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पालन करावे, मात्र या निर्देशाचे पालन राज्य शासन करत नाही. त्यामुळे कुठलेही निर्णय लादू नयेत. कृती समितीने या बाबत उच्च न्यायलयात दाद मागीतली असता न्यायालयाने मागासवर्गीय कृती समितीचे बाजूने निकाल दिला आहे. या र्बैठकीत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी आमदार रवी राणा, कृती समितीचे सचिव उमेश ढोणे व पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून अनुसुचित जमातीसाठी शासन निर्णय काढण्याची मागणी केली आहे.यावेळी कृती समितीचे संजय हेडाऊ, बी. के. हेडाऊ, रमेश गजबे, जगानन सूर्यवंशी, जितेंद्र ठाकूर, चेतन पाटील, सुरेश अंबुलगेकर, रवी चटलावार, डी. बी. नांदकर, के. पी. मेडबालमी, मधुकर सोमलवार, गणेश हेडाऊ, केदार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)