शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये मुंबई रेल्वे प्रवासात उडणार गोंधळ

By admin | Updated: November 27, 2015 00:34 IST

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे.

विशेष गाडी सोडण्याची मागणी : चैत्यभूमीवर ये- जा करणाऱ्यांची गर्दी

अमरावती : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे. त्यामुळे १ ते १० डिसेंबरदरम्यान मुंबई रेल्वे प्रवासात गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, या आशयाची मागणी रिपाइंचे महानगर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी केली आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधक, भुसावळ आणि नागपूर विभागाचे प्रबंधकांना निवेदन सादर करुन विदर्भातील आंबेडकरी अनुयायांची अभिवादनासाठी उसळणाऱ्या गर्दीबाबतची वस्तुस्थिती रिपाइंचे अशोक नंदागवळी यांनी मांडलीे. बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी महिला, पुरुषांसह आबालवृद्धाचाही समावेश राहतो. आंबेडकरी अनुयायांची या काळात होणाऱ्या गर्दीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ज्या प्रवाशांचे आरक्षण असताना त्यांना सुखरुप प्रवास करता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांची दादर येथील चैत्यभूमिवर होणारी गर्दी लक्षात घेता यंदा १ ते १० डिसेंबर या कालावधीत मुंबई ये- जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय करावी, असे नंदागवळी यांचे म्हणने आहे. नागपूर आणि अमरावती रेल्वे स्थानकावरुन या १० दिवसांच्या कालावधीत किमान चार विशेष गाड्या सोडल्या तर नियमीत प्रवाशांना त्रास होणार नाही. अन्यथा मुंबईकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांना १ ते १० डिसेंबर या कालावधीत प्रचंड त्रास घेवून प्रवास करावा लागेल. रेल्वे गाड्यात आरक्षण असताना नियमीत प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेवर प्रवास करता येत नाही. (प्रतिनिधी)