शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

कर्ज पुनर्गठन मृगजळच !

By admin | Updated: July 1, 2015 00:34 IST

शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला

शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग : मागील वर्षीच्या कर्जदारांचेच कर्जात रुपांतरजितेंद्र दखने अमरावतीशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही. याबाबत साशंकताच आहे. कारण जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ८२७ शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ३८ हजार ७६१ शेतकरी हे मागील पाच वर्र्षांपासून थकबाकीदार आहेत. याबाबत प्रशासन म्हणण्यानुसार, कर्जाचे पुनर्गठन हे मागील वर्षीच्या कर्जदार शेतकऱ्यांचेच होईल. त्यापूर्वीच्या नाही. त्यामुळे व शासनाकडून पुनर्गठनासाठी मंजूर व वाटप करण्यात येणाऱ्या रकमेतही फरक असून अद्याप तब्बल ५० टक्के रक्कम अपाप्त असल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. शासनाने कर्ज पुनर्गठणासाठी अमरावती जिल्ह्यासाठी १६९५.४४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. थकीत रक्कम द्यावी५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी स्वरुपात ३९४ कोटी रुपये देण्याचे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. सोबतच २०१४ मधील नैसर्गिक आपत्तीने बाधित मदतीपैकी ४० टक्केच मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे उर्वरित ६० टक्के रक्कम देण्यात यावी. अर्ज करणे आवश्यक कर्ज रूपांतरणासाठी संबंधित बँकेकडे शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँकेशी करार करून दिल्यानंतरच कर्ज पुनर्गठन आणि त्यानंतर नवीन कर्जाची उचल शेतकऱ्यांना करता येणार आहे. कर्जाची परतफेड पाच वार्षिक हप्त्यांत करावी लागणार आहे. यापैकी पहिला हप्ता ३० जून २०१५ ला देय राहणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.थकीत कर्जदारांनाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. पण त्यांनाच कर्ज मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. त्याचा सातबारा कोरा करुन नव्याने कर्ज द्यावे. - प्रवीण काडगाळे,शेतकरी.रिझर्व्ह बँकेने सरसकट कर्ज वाटपाची सूचना दिल्यास आदेशानुसार बँकांना सूचना देता येईल. मात्र सध्या रिझर्व बँकेच्या जुन्या सूचनेनुसार कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. अनंत खोरगडे, जिल्हा अग्रणी बँक.मागील वर्षी ज्यांनी कर्ज घेतले अशा चालू खातेदारांचेच कर्ज पुनगर्ठन होणार आहे. त्यांना मागील व यंदाचे मिळून कर्ज फेडावे लागेल. आत्महत्येची नोंद झालेल्या लाभ मिळेल. सुरेश बगळे, तहसीलदार.