अंमलबजावणी सुरू : १५ शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण अमरावती: राज्य शासनाकडून कर्जाचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहसारी बँकेने स्वनिधीतून कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी बँकेच्या मुख्य शाखेत जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांना अर्ज पुनर्गठणाचे धनादेश बॅकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले आहेत.जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी अडचणीत मदतीचा हात दिला आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा भार कायम आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्ज माफी द्यावी, यासाठी सतत मागणी शासन दरबारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली. परंतु शासनाने कर्ज माफी न देता कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी करण्यात आल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. कुठलाही शेतकरी कर्जवाटपासून वंचित राहू नये. परिणामी वंचित शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम निघून जाऊ नये याकरिता जिल्हा बँकेच्या स्वनिधीतून कर्जवाटपाचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला. बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख, बँकेचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये अमोल जहाकर, भैया चौधरी, प्रदीप गतफणे, ज्ञानेश्र्वर चौधरी, श्रीकृष्ण कडू, ज्ञानेश्र्वर भारती, प्रणिता भारती, रमाकांत चोरपगार, ज्ञानेश्र्वर कुऱ्हेकर, प्रकाश यादगिरे, शाम अंबुलकर, आदी शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक पी.बी. काळबांडे, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशिकर, पी.एन.निमकर, एस.टी. देशमुख, जे.डी.पटेल, संजय वानखडे, डी.एस. काळे, पी.बी. अलोणे, एस. जे. पावडे, बँक अधिकारी जे.सी.राठोड, डी.एस. आलेणे,डी. बी. देशमुख, एस के. चारथळ, सुभाष पाथरे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्हा बँकेचे स्वनिधीतून कर्जवाटप
By admin | Updated: July 19, 2016 00:17 IST