शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची राखरांगोळी, भाजल्याने एकाचा मृत्यू

By admin | Updated: January 1, 2017 00:42 IST

लोणीनजीकच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री दोन ट्रकची आगीने राखरांगोळी झाली, तर एकाचा जळून मृत्यू झाला.

लोणीतील घटना : महामार्गावरील वाहतूक पाच तास खोळंबली बडनेरा : लोणीनजीकच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री दोन ट्रकची आगीने राखरांगोळी झाली, तर एकाचा जळून मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्य महामार्गावरची वाहतूक पाच तास खोळंबळी होती. शुक्रवारी रात्री रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या व लोखंडाची टिनपत्रे वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर अपघात झाला. अपघातानंतर केमिकलने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने दोन्ही ट्रक आगीच्या विळख्यात सापडले. आगीचे मोठमोठे लोळ उठल्याने नजीकच्या लोकवस्तीतील नागरिक धास्तावले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे तब्बल दहा पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीचे भयावह दृश्य पाहून गावकरी धास्तावले होते. या आगीच्या विळख्यात केमिकल पदार्थ वाहून नेणारा ट्रक चालक अडकला आणि त्याचा जळून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली. ट्रकमध्ये केवळ चालकाला सांगडाच पोलिसांना आढळून आला आहे. मात्र, तो ट्रक कुठून आला व कुठे जात होता, याबाबतची चौकशी पोलीस करीत आहेत. घटनास्थळाला तहसीलदार व्ही.बी. वाहुरवाघ, डीवायएसपी पालवे, सहायक पोलीस निरीक्षक डी.एच. ब्राम्हणे, उपनिरीक्षक बावणकर, अनिल धोटे, प्रकाश किल्लेदार, संजय मांजेकर, तातेडे, गजानन डवरे, बाळासाहेब भागवत, मनोज मुंदाने, पवन पानझडे, जितेंद्र शिंदे, मोंढे, तलाठी मिल्ले यांच्यासह अन्य अधिकारी रात्रभर तैनात होते. (शहर प्रतिनिधी)