शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याचा मृत्यू; नातेवाईकांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तोडफोड

By admin | Updated: April 3, 2015 23:51 IST

दोन वर्षीय चिमुकल्याला भाजलेल्या अवस्थेत दाखल केल्यावर त्यांचा तासभरानंतर मृत्यू झाला.

उपचारात हलगर्जीपणा : भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावरअमरावती : दोन वर्षीय चिमुकल्याला भाजलेल्या अवस्थेत दाखल केल्यावर त्यांचा तासभरानंतर मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा इर्विन रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. माहितीनुसार, कारंजा लाड तालुक्यात येवर्डा येथील रहिवासी नंदू रिठे यांचे किराणा दुकान आहे. दुकान व घर एकाच ठिकाणी असल्यामुळे कुटुबींतील सदस्य नेहमीच दुकानात ये-जा करतात. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजतादरम्यान नंदू रिठे यांनी दुकानात दिवा लावला होता. दरम्यान त्यांची दोन वर्षीय मुलगी गायत्री दुकानात आली असता दिवा अचानक कागदावर पडल्याने कागदांनी पेट घेतला. क्षणातच आगीचा भडका उडाल्याने गायत्री ९० टक्के भाजली. तिला तत्काळ कारंजा लाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारकरिता नेण्यात आले. गुरुवारी रात्री तिच्यावर उपचार सुरुच होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला शुक्रवारी सकाळी ११ वाजता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वार्ड क्रमांक ४ मध्ये गायत्रीवर तब्बल तासभर उपचार करण्यात आले नाही, ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून नातेवाईकांनी केला. मात्र, संपर्क झाला नाही. काही वेळानंतर गायत्रीचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक सतप्त झाले आणि त्यांनी वार्डातील टेबल खुर्च्या व कांचाची तोडफोड केली.