शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत गर्भवती मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:49 IST

स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने घडली घटना : मुलीला जन्म देऊन घेतला जगाचा निरोप 

धारणी (अमरावती) : येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने अन्य रुग्णालयात हलविलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतूनंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघड झाली. 

अर्चना मंगेश कासदेकर, असे मृत गर्भवती मातेचे नाव आहे. माहितीनुसार, पाथरपूर गावातील ही महिला माहेरी भोकरबर्डी येथे बाळंतपणासाठी आली होती. शनिवारी प्रसववेदना झाल्यामुळे तिला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र, रविवारी सकाळी ९ वाजता रुग्णालयातील परिचारिकेने डॉक्टर नसल्यामुळे व ठोके कमी झाल्यामुळे गर्भवती महिलेस अन्यत्र हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्या आदिवासी महिलेला उतावली येथील सुशीला नायर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे तिची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिची प्राणज्योत मालवली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आला. दरम्यान एका महिलेच्या तक्रारीवरून उपजिल्हा रुग्णालयातील दोन स्त्रीरोग तज्ज्ञांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने ते रजेवर गेलेत. अन्य एक तज्ज्ञदेखील रजेवर गेल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप होत आहे. ती गर्भवती उपजिल्हा रुग्णालयात परवा आली होती. तिच्यावर स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत उपचार करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर होती. परंतु, शनिवारी सकाळी तिने स्वत:हून सुट्टी मागितली. त्यानंतर तिचे काय झाले सांगता येणार नाही. वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभार चिखलदºयाच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे आहे. मी सध्या तात्पुरता कारभार पाहत आहे. - धनंजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला