शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्ख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू, अन्नातून विषबाधाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 10:18 IST

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे.

मोहन राऊत

धामणगाव - मुलींवर खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केला प्रकृती ठीक असल्याने रात्रीला घरी आणले मात्र पहाटे दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचा एका दहा मिनिट फरकाने मृत्यू झाल्याने संपूर्ण  वीरूळ रोंघे गाव हळहळले आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन या घटनेमागील शोध घेत आहे. याच दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधामुळे हा प्रकार घडली असावी असा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे. चैताली ही गावातील माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता पाचवी शिक्षण घेत होती तर नंदिनी प्राथमिक मराठी जि. प. शाळेत इयत्ता चौथा वर्गात होती नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नाही तर चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती. दुपारी दोघी सख्ख्या चुलत बहिणी एकत्र खेळल्या मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे, ताप व हगवण लागल्याने धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दोघीची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी नेण्यात आली. मात्र अचानक रात्रीला दोघींची  प्रकृती बिघडली व पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या दहा मिनिटाच्या फरकाने मृत्यू झाला.

दोन सख्ख्या बहीण भावावर केलेले उपचारमृतक नंदिनीची मोठी बहीण भक्ती  वय १३ वर्ष व मृतक चैतालीचा लहान भाऊ देवांश  वय ३ वर्ष यांना रात्रीला पोटात दुखू लागल्याने दोघांनाही शुक्रवारी पहाटे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.

विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाजविरूळ रोंघे  गावात एकाच घरा शेजारी  राहणाऱ्या साव कुटुंबातील  दोन्ही मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते असा प्राथमिक अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाने येथे तपासणी शिबिर लावण्यात आले आहे.  मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रा. प सदस्य मंगेश गुल्हाने यांनी केली आहे दरम्यान महसूल, पोलिस, आरोग्य प्रशासन  घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मुलीचां मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदानंतर उलगडा होणार आहे.संपूर्ण गाव हळहळले शेत मजुरीचे काम करणाऱ्या साव कुटुंबातील नंदिनी व चैताली या दोन्ही मुली जेवढ्या शांत तेवढ्या हुशार होत्या याच वर्षी चैताली ही पाचव्या वर्गात प्रवेश घेतला होता. तर नंदिनी ही चौथ्या वर्गात शिकत होती सख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे.