लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. दुसरीकडे बाजार समितीचे पदाधिकारीदेखील बाजार समितीच्या या कारभाराला कंटाळले आहेत. नाफेडच्या या मनमानी कारभारविरुद्ध शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला असून बाजार समिती व खरेदी विक्री संघानेही त्यास पाठिंबा जाहीर केला आहे.बाजार समितीमध्ये शेतमालाची पाहणी करण्यासाठी नाफेडच्यावतीने ग्रेडर नेमला आहे, तर एक अधिकारी बाजार समितीचा आहे. बाजार समितीचा अधिकारी हा शेतकºयांचा माल तपासणी करून नाफेडच्या ग्रेडरकडे पाठवितो. मात्र, नाफेडचा ग्रेडर माल खराब असल्याचे सांगून रद्द करत आहे. यामुळे शेतकºयांना आपला माल परत घेऊन जावा लागतो किंवा कमी किमतीत व्यापाºयांना विकावा लागतो.बाजार समितीमध्ये शुक्रवारी शेतकरी व नाफेडच्या ग्रेडरमध्ये मालाच्या दर्जावरून तणाव निर्माण झाला. बाजार समितीच्या सभापती बाबाराव बरवट, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या.आॅनलाईन नोंदणी होणार कशी ?आधारभूत दराने एफएक्यू प्रतिचे मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू आहे. यासाठी शेतकºयांना मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागते. यानंतर एसएमएसच्या माध्यमातून खरेदीबाबतची माहिती देण्यात येते. मात्र, ज्या शेतकºयाला साधा मोबाईल कळत नाहीत, त्यांना एसएमएस कसा कळणार, हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असे पाडले जातात भावखरेदी केंद्रावर शेतमाल आणल्यास व मशीनचे तपासणी केल्यावर माल ओला आहे. मालात खडे, माती कचरा आहे. माल बारीक आहे. या सबबी पुढे करून मालाचे भाव पाडले जात आहेत. सोयाबीनला प्रतीक्विंटल १८00 ते २६00 रुपये भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत हा मिळणारा भाव नगण्यच असल्याने शेतकरी सध्यातरी वैतागले आहे.नाफे डचा ग्रेडर शेतकºयांच्या मालाची तपासणी करतो व तो खराब आहे असेच सांगत आहे, त्यामुळे शेतकºयांना माल विकताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतकºयांजवळ पैशा नसल्याने त्यांना माल विकणे हाच पर्याय आहे. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकºयांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून आमचाही पाठिंबा त्यांना आहे.- बाळासाहेब हिंगणीकर,संचालक, बाजार समिती दर्यापूर
शासन खरेदी केंद्रावर मरण यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:29 IST
बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.
शासन खरेदी केंद्रावर मरण यातना
ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा इशारा : बाजार समिती, खरेदी विक्री संघाचाही समावेश