शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी करताना शेतमजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:59 IST

चांदूर बाजार ताालुक्यातील खरवाडी येथे एका शेतमजुराचा फवारणी करताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदाम गंगाराम गभणे (५५, रा. खरवाडी) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील तिसरी घटनाहरभरा पिकावर करीत होता फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर बाजार ताालुक्यातील खरवाडी येथे एका शेतमजुराचा फवारणी करताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदाम गंगाराम गभणे (५५, रा. खरवाडी) असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान मृत्यूची ही तिसरी घटना आहे.प्राप्त महितीनुसार, तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या खरवाडी येथील शेतमजूर सुदाम गभणे हे गावातीलच विश्वनाथ इंगोले यांच्या शेतात हरभरा पिकावर फवारणीसाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजता गेले होते. फवारणी करताना दुपारी १२ च्या सुमारास त्यांना भोवळ आली. बेशुद्धावस्थेत त्यांना शेतमालक व अन्य मजुरांनी चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृताचा मुलगा योगेशने दिलेल्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी मर्ग दाखल केला.याप्रकरणी ठाणेदार उदयसिंह साळुंके यांच्या मार्गदर्शनात संजय इंगोले व मंगेश म्हस्के तपास करीत आहेत. मृत सुदाम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. यासंदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काठोडे यांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.रुग्णाला इस्पितळात आणले तेव्हा तो मृत झाला होता. त्याचा मृत्यू कशाने झाला, हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन झाले असून, अहवालानंतरच माहिती कळू शकेल.- चिन्मय बुजुर्ग, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चांदूरबाजार

टॅग्स :Farmerशेतकरी