मारोती पाटणकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी : पोटफुगीवर उपाय म्हणून आठ दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम लोखंडी सळईने चटके देण्यात आले. हा अघोरी उपचार सहन न झाल्याने बाळाला जीव गमवावा लागला. ही घटना मेळघाटातील कुही येथे मंगळवारी उघडकीस आली.मेळघाट परिसरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून, त्यांच्या सोयीसाठी शासनस्तरावर विविध योजनांद्वारा शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. ठिकठिकाणी दवाखाने, शाळा अशा विविध सुविधा शासनाने केल्या आहेत. मात्र, त्यांच्यात अंधश्रद्धेला मोठा वाव असल्याने ते दवाखान्यात उपचार न करता, घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या असताना, त्यांना फाटा देत अघोरी प्रथेला बळी पडत असल्याचे चित्र २१ व्या शतकातही दिसून येत आहे. तसाच प्रकार मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमी येथे घडला. २२ आॅक्टोबर रोजी यशोदा पंकज बेठेकर (कुही) या हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाल्या. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, आठ दिवसांनी त्याच्या पोटावर फुगारा आला. याला आदिवासी समाजात ‘पोपसा’ मानतात. असा प्रकार निदर्शनास आल्यास आदिवासी महिला थेट दवाखान्यात न जाता, भूमकाकडे जाऊन बाळावर उपचार करुन घेतात. भूमकाच्या उपचाराने बाळ दुरुस्त होतो, अशी त्यांनी धारणा आहे. त्याने गरम चटके पोटाला दिले. ते बाळाला सहन न झाल्याने त्याने आकांत करीत प्राण सोडला. मेळघाटात यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. शासनाकडून यावर उपाय म्हणून दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला व जनजागृती केली जात आहे.
सळईच्या चटक्यांनी बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:00 IST
पोटफुगीवर उपाय म्हणून आठ दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम लोखंडी सळईने चटके देण्यात आले. हा अघोरी उपचार सहन न झाल्याने बाळाला जीव गमवावा लागला. ही घटना मेळघाटातील कुही येथे मंगळवारी उघडकीस आली.
सळईच्या चटक्यांनी बाळाचा मृत्यू
ठळक मुद्देअंधश्रद्धेचा बळी : पोटदुखीवर केला अघोरी उपाय