शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पंचबोल पॉइंटवरून कोसळून दोघांचा मृत्यू, माकडाच्या मागे धावताना कोसळले दरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:02 IST

चिखलदरा (अमरावती) : येथील पंचबोल पॉइंटवरील पाचशे फूट खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.

चिखलदरा (अमरावती) : येथील पंचबोल पॉइंटवरील पाचशे फूट खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. माकडाने जॅकेट हिसकून पळ काढला. त्याच्या मागे धावताना दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर पंचबोल पॉइंटवर गर्दी उसळली होती.नयन श्रीकृष्ण ढोक (१९) व वैभव साहेबराव पावडे (२३) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, ते चांदूरबाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी होते. वैभव पावडे, नयन ढोले, स्वप्नील डाखोडे, सुमीत फुटाणे, अक्षय तुपटकर व त्यांचा मित्र अमोल हे दोन दुचाकीने चिखलदरा येथे आले होते. पंचबोल पॉइंटवर निरीक्षण करीत असताना माकडांनी नयनचे जॅकेट पळविले. तो माकडाच्या मागे धावला. तोल गेल्याने दरीत कोसळला. नयनला वाचविण्यासाठी गेलेला वैभवही पाठोपाठ पाचशे फूट खोल दरीत कोसळला.घटनेची माहिती मिळताच मरिमपूर येथील आदिवासींच्या बचाव पथकाने दोघांना बाहेर काढले. नयनचा मृत्यू झाला होता, तर वैभव गंभीर जखमी असल्याने त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून, ठाणेदार धर्मा सोनूने चौकशी करीत आहेत. चिखलद-यात मागील तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. 

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे काही औरच !माकडाने जॅकेट नेल्याने हा अपघात झाल्याचे मृतांच्या सोबत असलेल्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हे युवक एकमेकांच्या मागे धावत, मस्ती करीत असल्याने हा अपघात घडला.

टॅग्स :Amravatiअमरावती