शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील १३ बिबटांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 17:41 IST

वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात विहिरीत व रस्ता अपघातात आतापर्यंत १३ बिबटांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केवळ एका बिबटाला विहिरीतून सुखरूप बचावण्यात वनविभागाला यश आहे, हे वास्तव आहे.

- अमोल कोहळे

पोहरा बंदी (अमरावती) : वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात विहिरीत व रस्ता अपघातात आतापर्यंत १३ बिबटांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केवळ एका बिबटाला विहिरीतून सुखरूप बचावण्यात वनविभागाला यश आहे, हे वास्तव आहे.वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत वाघ,बिबटांसह अन्य वन्यप्राणी व विविध औषधीयुक्त वनस्पती ही अमरावती जिल्ह्याला निसर्गाची देण आहे. या जंगलात तृणभक्षी प्राण्यांसह इतर वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने हिंंस्त्र प्राण्यांनादेखील भक्ष्य टिपणे सहज शक्य होते. तसेच पाणवठे व इतर अनुकुलतेमुळे हा परिसर बिबटांसाठी पोषक असल्याने बिबटांची संख्या दिवसेंदिवस वाढत मात्र, जंगलातून होत असलेली वाहतूक व उघड्या बेवारस विहिरी त्यांच्यासाठी शाप ठरू लागले आहे. जंगलाचा राजा म्हटल्या जाणाºया वाघ व त्यांच्या अतर प्रजातींची संख्या देशात फार कमी झाली आहे. हे वन्यप्राणी केवळ कागदापुरते मर्यादित राहू नये, साठी वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ वनविभागासह शासनाने कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे वन्यप्राणांना सहजतेने संपविण्याची कुणी हिंमत करीत नसले तरी त्यांचा होणारा अकाली मृत्यू ही चिंतेची बाब आहे.  

इतर ठिकाणचे हिस्त्र प्राण्यांचे स्थलांतरणवडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचे संरक्षण नीट होत असून, येथील वातावरण हिंस्त्र प्राण्यांसाठी अनुकुल असल्याने या भागात स्थलांतरित केलेले वाघ (नवाब व वाघीण) तसेच आदी चंद्रपूर बल्लारशाच्या जंगलातील वन्यप्राणी स्थलांतरित करण्यात आले होते. त्यांना येथील वातावरण सूट झाल्याने ते अनेक वर्षे येथे वास्तव्यास राहिले. त्यांना पुन्हा पूर्वक्षेत्रात नेऊन सोडल्यावर ते परत या भागात शिरल्याच्या घटना अधोरेखित झाल्या आहेत. तसेच कु-हा परिसरातील एका शेतातील उघड्या विहिरीत बकरीची शिकार करताना एक बिबट विहिरीत पडला होता. त्याला वनकर्मचा-यांनी अथक प्रयत्नाने पिंज-यात कैद करून वैद्यकीय तपासणीअंती पुन्हा जंगलात सोडले होते. त्याच एका बिबटाला संकटातून वाचविण्यात वनकर्मचा-यांना यश आले.

असे दगावले १३ बिबटचांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील कु-हा शिवारातील एका शेतातील विहिरीत पडून बिबट दगावला. अडीच वर्षीय मादी बिबट मार्डी परिसरात बिटमध्ये मृतावस्थेत आढळली. पाथरगाव बिट परिसरातील एका शेतात बिबटाचा मृत्यू झाला. तिवसा परिसरातील तारेच्या कुंपणात अडकून बिबटाचा मृत्यू झाला. शेंदूरजना खुर्द परिसरात एका शेतात चार वर्षीय बिबटाचा मृत्यू झाला. वाढोणा परिसरात एका शेताच्या विहिरीत बिबटाचा मृत्यू. चिरोडी जंगलात एका साडेचार वर्षीय बिबटाचा मृत्यू झाला. चिरोडी जंगलालगतच्या एका वाडीत बिबट मृतावस्थेत आढळून आला. 

वडाळी वनपरिक्षेत्रातील भवानी तलावा परिसरात बिबटाचा मृत्यू झाला. हायवेवर अपघातात एका बिबटाचा मृत्यू झाला. वैष्णवदेवी मंदिराजवळ सात महिन्यांचे मादी बिबट अपघातात दगावले. धबधबा परिसरात अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. वाघामाई परिसरात अपघातादरम्यान एक बिबट दगावला.

टॅग्स :leopardबिबट्याAmravatiअमरावती