अमरावती/ संदीप मानकर
मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, तसेच वाहनांचे पासिंग यासह इतर कामांसाठी कोरोनाकाळात शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, अमरावती आरटीओ कार्यालयात २७ व २८ सप्टेंबरपर्यंतच अपॉईंटमेंट घेतलेल्या उमेदवारांना लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही नागरिकांना मुदत ३० सप्टेंबर असल्याने लायसन्स बाद होण्याची भीती सतावत आहे.
ज्यांनी लर्निंग लायसन्स काढले, अशांच्या कायमस्वरुपी लायसन्सकरिता रोज २३० जणांना आरटीओत ऑनलाईन अपाॅइंटमेंट देण्यात येत असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली.
बॉक्स:
काय आहेत अडचणी ?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोरोनाकाळात आदेश काढून ज्यांनी लर्निंग लायसन्स काढले, पण कोरोनामुळे आरटोओत येवू शकले नाही, अशा लायसन्सधारकांना कायमस्वरुपी लायसन्स काढण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता ती मुदत संपत असल्याने उमेदवारांनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली आहे. मात्र, अमरावतीत कोटा फुल्ल झाला नसून त्यांना अपॉइंटमेंट देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी कुठलीही अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स:
तारीख मिळवूनही उमेदवार येत नाहीत
ज्या उमेदवारांना कायस्वरूपी लायसन्स काढायचे आहे, अशांना तारीख देण्यात येते. मात्र, त्या तारखेवर उमेदवार हजर राहत नसल्याचे काही उदाहरणे समोर आली आहे. रोजचे आठ ते दहा उमेदवार येतच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर अनेक जण आरटीओशी संपर्क साधतात, मात्र त्यांना ऑनलाईन तारीख मिळत नसल्याचे वास्तव आहे.
बॉक्स:
रोजचा कोटा २३०
पर्मनन्ट लायसन्स मिळविण्याकरिता रोजचा कोटा हा आरटीओत २३० एवढा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसारच ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात येते. फिटनेस प्रमाणपत्राकरिता काही कोटा नसतो. ज्याची मुदत संपली आहे. अशी वाहने आरटीओत दाखल होतात. एका मोटर वाहन निरीक्षकांना रोज २५ वाहने तपासण्याची जबाबदारी देण्यात येते, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांनी सांगितले.
कोट
लर्निंग लायसन्स काढले आहे. आठ दिवसातच अपॉइंटमेंट मिळाली. आता लवकरच कायमस्वरूपी लायसन्स काढावे लागणार. मुलाचे लायसन्स काढण्यासाठी आरटीओत आलो.
दीपक भिलपवार, कठोरा, अमरावती.
कोट
आरटीओचा कोट आहे.