शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमधील स्वच्छतागृहात आढळले मृत अर्भक; सिटी कोतवाली पोलिस करत आहेत तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:06 IST

Amravati : 'ती' आली, चिठ्ठी काढली अन् अर्भक टाकून गेली

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतागृहात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एक नवजात अर्भक मृत आढळल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात एक गर्भवती महिला ७ वाजता भरती झाली होती. तिच्यासोबत दोन महिला व एक पुरुष देखील होता. काही वेळाने हे चौघेही दिव्यांग ओपीडी विभागाजवळ असलेल्या स्वच्छतागृहात गेले; परंतु त्यानंतर ते चौघेही रुग्णालयातून पसार झाले. स्वच्छतागृहात अर्भक आढळून येताच याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना देण्यात आली असून, ते या घटनेचा तपास करत आहेत.

रविवारी रुग्णालयातील ओपीडी बंद होती; परंतु इमर्जन्सी अपघात कक्ष मात्र सुरू होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास २१ वर्षीय गर्भवती तरुणी ही तेथे दाखल झाली होती. रविवारी रुग्णालयातील ओपीडी बंद होती; परंतु इमर्जन्सी अपघात कक्ष मात्र सुरू होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास २१ वर्षीय गर्भवती तरुणी ही तेथे दाखल झाली होती. रुग्णालयातून बाहेर गेले. काही वेळाने या स्वच्छतागृहात एक व्यक्ती गेला असता त्याला शौचालयाच्या सीटवर डोके आत असलेला अर्भक आढळून आला. मृत अर्भक बाहेर काढून रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आले.

"रविवारी रात्री इर्विनच्या स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक आढळले. त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज जप्त करण्यात आले. ते तपासले जात आहे. इर्विन व डफरिन प्रशासनाला प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिलांची माहिती मागितली आहे."- मनोहर कोटनाके, ठाणेदार, सिटी कोतवाली

"रविवारी रात्री स्वच्छतागृहामध्ये अर्भक आढळून आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. तसेच त्यांना अपघात कक्षाजवळील सीसीटीव्ही फुटेजही देण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेचा पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे." - डॉ. प्रीती मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन

टॅग्स :Amravatiअमरावती