फोटो -
१६ मेगावॅट वीजनिर्मिती, गव्हाणकुंडात विदर्भातील एकमेव प्रकल्प, पाच हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
वरूड : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा म्हणून राज्य शासनाकडून गव्हाणकुंड येथे उभारण्यात येत असलेला १६ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण झाला आहे. यामुळे कृषिपंपांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. याचा लाभ पाच हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
विदर्भातील एकमेव १६ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे २४ डिसेंबर २०१७ ला भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटेंसह डझनभर मंत्र्याच्या उपस्थित भूमिपूजन पार पडले होते. गत महिन्यात प्रकल्प पूर्णत्वास येऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. विजेचे दरसुद्धा कमी आकारण्यात येणार आहेत. ही वीज टेम्भुरखेडा उपकेंद्रापर्यंत पोहोचली आहे.