अचलूपर : अचलपूर तालुक्यातील धान्य दुकानांवा पुरविलेल्या पॉस मशीनचा डेटा लॉक झाल्याने अनेक नागरिकांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे मोफत धान्य बुडाले. परिणामी रेशन कार्डधारकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तहसील प्रशासनाने यात हस्तक्षेप करून पुन्हा डेटा बेलावून रेशनधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
सार्वजिनक वितरण प्रणालीद्वारे दरमहा केला जाणारा स्वस्त धान्याचा पुरवठा, कोरोनाकाळातील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे मोफत धान्य डिसेंबर महिन्यात पुरवठा करण्यात आले. मोफत आणि नियमित मिळणारे धान्य एकाच वेळी डिसेंबर महिन्यात वाटप करण्यात येत असताना, अचानक २३ डिसेंबरला पॉस मशीनमधील डेटा लॉक झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. पॉस मशीनमधील डेटा लॉक झाल्याने शहर व ग्रामीण भागातील शेकडो रेशन दुकानदारांना डिसेंबरच्या वाटपासाठी ८ जानेवारी ही तारीख देण्यात आली होती. काहींना नियमित धान्य मिळाले. मात्र, अनेकांना मोफत धान्य अजूनपर्यंत मिळाले नाही. रेशन कार्डधारक दुकानादारांकडे वारंवार रेशनची मागणी करीत आहे. तथापि, मशीनचा डेटा लॉक झाल्याने धान्य देता येत नाही, असे उत्तर रेशन दुकानदारांकडून मिळत आहे. याकडे अचलपूर तहसील प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी रेशन कार्डधारकांनी केली आहे.
कोट
जिल्हा प्रशासनाला याबाबत अहवाल पाठविला. लवकरच पुन्हा याबाबत जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठवून तक्रारी निकाली काढण्यात येतील.
- शैलेश देशमुख, पुरवठा अधिकारी, अचलपूर