शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डेटा लिक; तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:29 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही खातेदारांचा डेटा लिक झाल्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे चोरी केले जात असल्याचा निष्कर्ष सायबर सेलने काढला आहे.

ठळक मुद्देसायबर सेल सक्रिय : एसबीआयचे एटीएम क्लोन केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही खातेदारांचा डेटा लिक झाल्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे चोरी केले जात असल्याचा निष्कर्ष सायबर सेलने काढला आहे. मात्र, डेटा कोठून लिक झाला आणि कोणी केला असावा, यासाठी पोलीस विभागाच्या व एसबीआयच्या सायबर सेलकडून कसून तपासणी केली जात आहे.एसबीआय खातेदारांच्या खात्यातून परस्पर रोख काढणाºया गुन्हेगारांनी अमरावती शहरातील काही बँक खातेदारांची गोपनीय माहिती मिळविली आहे. त्याआधारे एटीएम क्लोन करून खात्यातून पैसे लंपास केले जात असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. 'एटीएम स्वॅप' करताना ही माहिती लिक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून त्या दिशेने सायबर सेल यंत्रणा तपास करीत आहे. आतापर्यंत शहरातील पाच नागरिकांच्या बँक खात्यातून लाखोंची रोख चोरी करण्यात आली. ही रोख हरियाणा, गुडगाव व आसाम शहरातून विड्रॉल करण्यात आल्याचे विवरण बँकेकडून खातेदारांना प्राप्त झाले आहे. राज्यात अशाप्रकारची फसवणूक करणारे अनेक जण सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खातेदारांची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रोख पळविली आहे. याबाबत अमरावती पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क करून सर्व दिशेने तपासकार्य सुरू केले आहे.बँक खातेदारांची इत्थंभूत माहिती बँकेत गोपनीय असते. ती बँक अधिकारी व कर्मचाºयांनाच माहिती असते. त्यामुळे बँकेतून खातेदारांची माहिती लिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे.एटीएममध्ये सुरक्षेचा अभावएसबीआयच्या बहुतांश एटीएम सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येते. अशा एटीएमवर सायबर गुन्हेगार लक्ष वेधून असू शकतात. अमरावती शहरातूनच बँक खातेदारांची माहिती लिक झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून हा डाटा कोठून लिक झाला याचा शोध पोलीस घेत आहे.पासवर्ड बदलवत रहाबँक खातेदारांनी एटीएम पासवर्डची माहिती कोणालाही सांगू नये, बाजारपेठेत खरेदी करताना किंवा पेट्रोलपंपावर 'एटीएम स्वॅप' करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी शक्यतो एटीएमचा 'पासवर्ड' बदलवीत राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.बँक खातेदारांच्या फसवणूक प्रकरणात डेटा लिक कोठून झाला, याचा शोध सायबर सेल घेत आहे. मुंबई सायबर सेलशी संपर्क करण्यात आला आहे.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त