शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

मेळघाटात भीषण पाणीटंचाईचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:29 IST

विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देमोथा येथील घटना : मनीषाचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला.मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मोथा गावातसुद्धा महिन्याभरापासून टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. मनीषा धांडे ही ९ जून रोजी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. बकेट ओढताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. महिलांनी आरडाओरड करताच नागरिक मदतीला धावले. मनीषाला चिखलदरा येथे ग्रामीण रुग्णालयानंतर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने तेथून नागपूरला रवाना करण्यात आले. तिच्यावर मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे ४ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.मृतदेहासाठी याचना, जिल्हाधिकाऱ्यांची तत्परताउपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या मनीषाचा मृतदेह आणण्यासाठी मदतीची याचना सोशल मीडियावर खोज संस्थेचे बंड्या साने यांनी टाकली होती. त्यावर प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर आदींनी प्रतिसाद दिला. सदर बाब जिल्हाधिकारी शैलेश नोवाल यांना माहीत होताच त्यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधला. यानंतर मनीषाचा मृतदेह नागपूरहून अमरावती आणि तेथून मोथा या गावापर्यंत शासकीय खर्चाने बुधवारी सायंकाळी ५ वाजता पोहचविण्यात आला.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई