शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या उतारावरच धोकादायक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:51 IST

नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्या वळण रस्त्याचे डायव्हर्शन हे फलक वाहन चालकांना दिसूनच पडत नाही. तसेच जेथून काम सुरू करण्यात आले त्याच्यासमोर सुस्पष्ट फलके नसल्यामुळे अनेक वाहने सरळ जात आहेत.

ठळक मुद्देवाहने जातात सरळ : अस्पष्ट फलकांमुळे वाढले अपघात

बडनेरा : बडनेरा मार्गावर नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल संपताच चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी धोकादायक वळण दिल्याने तसेच अस्पष्ट फलकांमुळे अनेक वाहने सरळ जात आहे. प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षितपणाच कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरवासियांसह वाहन चालकांमध्ये आहे.नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्या वळण रस्त्याचे डायव्हर्शन हे फलक वाहन चालकांना दिसूनच पडत नाही. तसेच जेथून काम सुरू करण्यात आले त्याच्यासमोर सुस्पष्ट फलके नसल्यामुळे अनेक वाहने सरळ जात आहेत. त्यामुळे कित्येकदा दुचाकीस्वार सरळ चौपदरीकरणाच्या कामातील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एसटी महामंडळाची बसदेखील यात फसली होती. बसचालकाच्या समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्याचप्रमाणे वळण रस्ता क्रॉस करून एक शहरबसदेखील रस्ता सोडून खाली गेली. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळेच असे अपघात घडले आहेत. उड्डाणपुलाच्या उतारावर जेथे काम सुरू आहे त्याठिकाणी वाहन चालकांना लक्षात येईल, अशी फलके लावावित, वळण रस्तादेखील दृष्टीस पडेल, अशा पद्धतीने डायव्हर्शनचे फलक लावावे, अशी शहरवासीयांसह वाहनचालकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष न दिल्यास मोठा अपघातदेखील घडू शकतो, हे नाकारता येणार नाही.चौपदरीकरणाच्या कामाला केव्हा येणार गती?नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल ते गांधी विद्यालयासमोरील रेल्वे उड्डाणपुलापर्यंतचे चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांमध्ये आहे. अवघ्या तीन किलोमीटर अंतराला एवढा वेळ का, या कामाला गती केव्हा येणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा