लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू बंगल्यासमोर कम्प्यूटर सायन्स विभागासाठी ८६ लाख रुपये खर्चून बांधलेली सदोष इमारत आजतायगत पाडण्यात आली नाही. इमारत धोकादायक असल्याचीे बाब १० वर्षांपूर्वी व्यवस्थापन परिषदेने मान्य केली. विद्यापीठ प्रशासनाला आता जीवहानीची प्रतीक्षा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.नागपूर येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी संस्था (व्हीआरसी) ने २५ वर्षांपूर्वी नकाशा, डिझाइन आदी बाबी तयार केल्या. त्यानुसार या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात झाले. ही इमारत हळूहळू काही फुटांपर्यंत जमिनीत पुरली गेली. त्यामुळे विद्यापीठाच्या ‘नॅक’ समितीपुढे गेल्या १० वर्षांत दोन वेळा ही इमारत झाकून ठेवण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे. या इमारतीसंदर्भात विद्यापीठाने दोन वेळा समितीचे गठण केले.काळ्या मातीवर ‘हेवीवेट’ इमारत?सदर धोकादायक इमारत ज्या ठिकाणी बांधण्यात आली, तो परिसर काळ्या मातीचा आहे. त्यावर ‘हेवीवेट’ डिझाइन मंजूर कोणी, कसे केले? विशेष म्हणजे, विद्यापीठात रूसा वा यूजीसीकडून प्राप्त निधी बांधकामात कसा गुंतविला जाईल, याचे नियोजन सतत सुरूच असते. तथापि, विद्यार्थिहित किंवा शैक्षणिक सुविधांना मात्र बगल दिली जाते.
विद्यापीठात धोकादायक इमारत; निर्णय केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST
नागपूर येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी संस्था (व्हीआरसी) ने २५ वर्षांपूर्वी नकाशा, डिझाइन आदी बाबी तयार केल्या. त्यानुसार या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात झाले. ही इमारत हळूहळू काही फुटांपर्यंत जमिनीत पुरली गेली. त्यामुळे विद्यापीठाच्या ‘नॅक’ समितीपुढे गेल्या १० वर्षांत दोन वेळा ही इमारत झाकून ठेवण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे. या इमारतीसंदर्भात विद्यापीठाने दोन वेळा समितीचे गठण केले.
विद्यापीठात धोकादायक इमारत; निर्णय केव्हा?
ठळक मुद्देप्रशासनाला जीवहानीची प्रतीक्षा? : १० वर्षांपासून केवळ फायलींचा प्रवास