शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:04 IST

Amravati : यापूर्वी शासन मदत, यंदा मात्र पडला विसर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंत्रणेद्वारा फक्त अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले. यापूर्वी २०२२-२३ च्या खरिपात शासनाने सततच्या पावसाने झालेल्या बाधित पिकांचे पंचनामे करून 'एनडीआरएफ'च्या निकषाने मदत दिली होती. यंदा मात्र शासनाला विसर पडला आहे.

यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला, त्यानंतर वाटचाल मंदावली व जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली ती अजूनही सुरूच आहे. यादरम्यान ३२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर आल्याने पिके खरडली गेली. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी यंत्रणेद्वारा करण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून सतत पाऊस असल्याने पिकांची वाढ खुंटली काही भागांत पिके पिवळी पडली. ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव व पाऊस यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अतिवृष्टी नसली तरी सततच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे. या बाधित पिकांसाठी शासनस्तरावरून कोणतेही निर्देश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सोयाबीन पिवळे, तुरीवर मर सततच्या पावसामुळे काही भागात सोयाबीनची कायिक वाढ झाली. तर काही भागात वाढ खुंटून पिवळे पडले आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. याशिवाय कीड व रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झालेला आहे. तुरीवर बुरशीजन्य रोगामुळे 'मर' रोग आलेला आहे. अनेक भागातील तुरी जागेवरच सुकत असल्याने सरासरी उत्पादनात कमी येणार असल्याचे वास्तव आहे.

जिल्हास्थिती (हेक्टरमध्ये) खरिपाचे पेरणी क्षेत्र : ६.३५ लाख सोयाबीनचे क्षेत्र : २.५१ लाख कपाशीचे क्षेत्र : २.२३ लाख तुरीचे क्षेत्र : १.१२ लाख

अतिवृष्टीच्या नुकसानीपेक्षा बाधित क्षेत्र जास्त जून व जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे ३७५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी ३२.२८ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नुकसान सततच्या पावसाने झालेले आहे. या नुकसानीसाठी शासनाच्या कोणत्याही सूचना नाही. शिवाय या बाधित पिकांना विम्याचा परतावादेखील मिळत नाही. 

टॅग्स :Amravatiअमरावती