शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने व-हाडात १०.५१ लाख हेक्टरचे नुकसान, आयुक्तांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:59 IST

गजानन मोहोड अमरावती : यंदाच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे १० लाख ५१ हजार हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ८१७ कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मंगळवारी शासनाला पाठविला.अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ९ लाख ४२ हजार ५५९ शेतकºयांनी १० लाख ८७ हजार ३७५ ...

गजानन मोहोड अमरावती : यंदाच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे १० लाख ५१ हजार हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ८१७ कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मंगळवारी शासनाला पाठविला.अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ९ लाख ४२ हजार ५५९ शेतकºयांनी १० लाख ८७ हजार ३७५ हेक्टरमध्ये कापसाची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंडअळीच्या संकटाने एकूण क्षेत्राच्या तुलनेत ९० टक्के क्षेत्रात कापसाचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. पाचही जिल्ह्यांतील संयुक्त अहवालानुसार, यामध्ये जिरायती कापसाचे ९ लाख ११ हजार ८४७ हेक्टर, तर बागायती कापसाचे १ लाख ३९ हजार ९२३ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे ६२८ कोटी ६७ लाख ६६ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे १८८ कोटी ३६ लाख १३ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे.बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंडअळीबाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी ७ डिसेंबरला पाचही जिल्ह्यधिकाºयांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या बैठकीत कापसाच्या बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या अनुषंगाने पाचही जिल्हाधिकाºयांनी संबंधित तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून संयुक्त अहवाल मागविला होता. बुलडाणा जिल्ह्याचा अहवाल उशिरा प्राप्त झाल्याने अखेर मंगळवारी विभागाचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी