संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची दाहकता शमविण्यासाठी उसाचा रस हा उत्तम पर्याय आहे. अंबानगरीत दररोजी ५० हजार ग्लास रसाची विक्री होते. त्यातून तब्बल पाच लाखांचा गल्ला या व्यावसायिकांकडे गोळा होतो.अंबानगरीत उसाच्या रसाची विक्री करणारे २०० पेक्षा जास्त व्यावसायिक आहेत. एक विक्रेता दररोज अंदाजे २०० ते २५० ग्लास रस विक्री करीत आहेत. एक ग्लास १० ते १५ रुपये प्रमाणे विकला जात असून, सरासरी चार ते पाच लाख रुपये प्रतिदिन व्यवसाय होत असल्याची माहिती उसाचे रस विक्रेत्यांकडून मिळाली आहे. उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सियसच्या वर गेल्याने विविध कंपन्यांच्या शीतपेयाच्या तुलनेत उसाच्या रसाला नागरिकांनी अधिक पसंती दर्शविली आहे.यासंदर्भात काही किरकोेळ रसवंती व्यावसायिकांशी चर्चा केली असता, एक हातगाडीवाला २०० ते २५० ग्लास रसाची विक्री आठ तासांच्या व्यवसायात करीत असल्याची माहिती मिळाली. रसात बर्फ टाकून असल्यास १० रुपये, तर विनाबर्फाचा १५ ते २० रूपये ग्लास उसाच्या रसाची विक्री करण्यात येते. आहे. एक व्यावसायिक किमात तीन ते चार हजारांचा व्यवसाय करतो. सरासरी २०० ते २५० व्यवसायिक दिवसभराचा चार ते पाच लाखांचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. पूर्वी विविध कंपन्याच्या कोल्ड्रिंक्सला चांगली मागणी होती. पण, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा थंड शीतपेयाऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती नागरिकांनी दर्शविली आहे. आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकही आता जागृत आहेत. त्या अनुषंगाने पोषक असलेल्या उसाच्या रसाला चांगली मागणी वाढली आहे. यातून शहरात उसाचा रस विक्री करणाऱ्या मोबाइल हातगाड्या तयार करण्यात आल्या आहेत. त्या शहराच्या कुठल्याही भागात वाहनासारख्या चालवीत कुठेही सहज नेता येतात. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक तरुणांना, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.सात रुपये प्रतिकिलोने उसाची खरेदीपुणे व अहमदनगर जिल्ह्यातून येथील फळबाजारात उसाची आवक होत आहे. येथून सात रुपये प्रतिकिलो दराने उसाची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ व्यवसाय करणाऱ्या ज्ञानेश्वर बारबुद्धे या युवकाने दिली. यातून ५० टक्के नफा मिळत असल्याने हा व्यवसाय फायदेशीर आहे. मी बी.एस्सी. अॅग्री आहे व अपंगसुद्धा आहे. नोकरी न मिळाल्याने हा व्यवसाय करीत आहे. यातून मला व इतर दोन लोकांना रोजगार मिळाला असल्याचे ज्ञानेश्वरने सांगितले.चांगल्या प्रतीच्या उसाच्या रसाला चांगली मागणी आहे. मी दररोज सरासरी २०० ते २५० ग्लास रसाची विक्री करतो. यातून किमान तीन ते चार हजारांचा व्यवसाय होत आहे. यातून मला रोजगार मिळाला आहे.- ज्ञानेश्वर बारबुद्धे व्यवसायिकदोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत घट झाली आहे. पूर्वी आठ ते नऊ कॅरेट विक्री होत होती. आता ती दोन ते तीन कॅरेटवर आली आहे. विविध जाहिराती व सोशल मीडियावरून अपप्रचार त्याला कारणीभूत आहे.- अनिल ठाकरे, शीतपेय विक्रेता, पंचवटी चौक
५० हजार ग्लास उसाच्या रसाची दररोज विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:21 IST
उन्हाची दाहकता शमविण्यासाठी उसाचा रस हा उत्तम पर्याय आहे. अंबानगरीत दररोजी ५० हजार ग्लास रसाची विक्री होते. त्यातून तब्बल पाच लाखांचा गल्ला या व्यावसायिकांकडे गोळा होतो.
५० हजार ग्लास उसाच्या रसाची दररोज विक्री
ठळक मुद्देइतर शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला पसंती : अंबानगरीत सरासरी पाच लाखांचा व्यवसाय