तीन स्पर्धा : पोलिसांचा चोख बंदोबस्त, तरूणाईचा जल्लोषअमरावती : ‘मच गया शोर..’चा गजर..पाण्याचा मारा...कोसळणारे थर..पुन्हा जिद्दीने प्रयत्न..आणि शेवटी उंचावर बांधलेल्या हंडीपर्यंत पोहोचल्याचा आनंद.. असे उत्कंठावर्धक वातावरण रविवारी शहरात दिसून आले. एकाच दिवशी शहरातील तीन प्रमुख चौकांमध्ये रंगलेल्या दहीहंडी स्पर्धांची पर्वणीच हौशी अमरावतीकरांना मिळाली. राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेच्यावतीने दहीहांडी स्पर्धा रंगली. राजापेठ चौकात युवा स्वाभिमान संघटनेची दहीहंडी स्पर्धा पार पडली. सोबतच जयस्तंभ चौकात युवा सेनेच्यावतीने दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. र् ेदरम्यान समूहनृत्य स्पर्धेची मेजवानीदेखील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली. डी.जे.च्या तालावर थिरकणारे पाय आणि गोंविदा पथकांनी रचलेले मानवी मनोरे लक्ष्यवेधी ठरले. एकाच दिवशी तीन जागी दहीहंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्यामुळे गोंविदा चमुंची तारांबळ उडाली. नाही म्हणायला या चमुंना अधिक संधीदेखील उपलब्ध झाल्या होत्या. युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने दरवर्षी ‘सेलिब्रिटंीना’ आमंत्रित केले जाते. यावेळी सिनेअभिनेता गोविंदा हे या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण ठरले होते. ‘आदर्श’ने फोडली राजकमल चौकातील हंडी नवयुवक विद्यार्थी संघटनेच्यावतीने राजकमल चौकात आयोजित केलेली २३ फूट उंचीवरील दहीहंडी धामणगाव रेल्वे येथील आदर्श मंडळाने फोडली. या स्पर्धेत एकूण आठ गोंविदाचमू सहभागी झाल्या होत्या. यात आदर्श मंडळाने २८ मिनिटांत दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकाविला. या चमुला रोख ३१ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले. शिरजगाव बंड येथील वीर भगतसिंह ग्रुपने २९ मिनिटांत दहीहंडी फोडून दुसरा, तर श्री हव्याप्रमंच्या हिंद केसरी मंडळाने ३२ मिनिटे व नमुना येथील रघुवीर मंडळाने ४० मिनिटांत दहीहंडी फोडून प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले.
दहीहंडीचा थरार !
By admin | Updated: September 7, 2015 00:19 IST