अखेर शिक्कामोर्तब : ३४९६.३२ चौरसमीटर अतिरिक्त बांधकाम अमरावती : जोशी कॉलनी परिसरातील आयएमए हॉलनजीक राजेश डागा यांच्या ‘डागा सफायर’ या रहिवासी वसाहतीमधील तीनही टोलेजंग इमारती महापालिकेने अनधिकृत ठरविल्या आहेत. महापालिक आयुक्तांनी तांत्रिक चूक मान्य केल्याने आपल्या इमारती अनधिकृत असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा डागा सफायरकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त हेमंत पवार यांनी डागा सफायरच्या तीनही इमारती अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे. डागा यांना १५ दिवसांमध्ये बाजू मांडायची असून त्यांनतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.ए,बी आणि सी या तीन इमारतींमध्ये डागा यांनी तब्बल ३४९६.३२ चौरसमीटर अनधिकृत बांधकाम केले आहे. बांधकाम सुरु असलेल्या तीनही इमारतींमध्ये विनापरवानगी बांधकाम करण्यात आले आहे. ‘डागा सफायर’च्या ‘ए’ इमारतीसाठी तळघर, तळमजल्यासह पहिला ते आठव्या मजल्यापर्यंत ११२६.२५ चौरसमीटर क्षेत्रफळात बांधकामाला महापालिकेकडून परवानगी देण्यात आली. प्रत्यक्षात डागा यांनी १७३४.४३ चौरसमीटर क्षेत्रफळात बांधकाम केले. डागा सफायरच्या ‘बी’ इमारतीसाठी २१७८.८० चौरसमीटर क्षेत्रफळात बांधकामाला महापालिकेकडून परवानगी देण्यात आली. उत्तर द्या, अन्यथा इमारती पाडूअमरावती : प्रत्यक्षात डागा यांनी या इमारतीत ४११४.६० चौरसमीटर क्षेत्रफळात बांधकाम केले. अर्थात १९३५.८० चौरसमीटर क्षेत्रफळात अधिकचे बांधकाम केले, तर ‘सी’ इमारतीसाठी तळघर, तळमजल्यासह पहिला ते आठवा मजल्यापर्यंत २८९६.७६ चौरसमीटर क्षेत्रफळात बांधकामाला महापालिकेकडून परवानगी देण्यात आली. प्रत्यक्षात डागा यांनी ३८४९.१० चौरसमीटर क्षेत्रफळात बांधकाम केले. अर्थात ९५२.३४ चौरसमीटर क्षेत्रफळात अधिकचे बांधकाम केले. विशेष म्हणजे या ठिकाणच्या भूखंडावर चार इमारतींचे बांधकाम करण्याची परवानगी डागा यांना मिळाली आहे. प्रत्यक्षात येथे ए,बी आणि सी या तीनच इमारतींची उभारणी सुरू आहे. या तीनही इमारतींमधील ३४९६.३२ चौरसमीटर अर्थात ३७६२० चौरसफूट बांधकाम अनधिकृत ठरविण्यात आले आहे.अनधिकृत आणि अधिकचे बांधकाम केल्याप्रकरणी राजेश डागा यांना महापालिकेकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. डागा यांना १५ दिवसांमध्ये बाजू मांडायची असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. प्रथमदर्शनी डागा यांनी ३४९६.३२ चौरसमीटर बांधकाम अनधिकृत केले आहे. महापालिकेच्या हद्दीतील मौजे कॅम्प शिट नंबर ३७ भूखंड क्रमांक ८/१ नझुल प्लॉट या जागेवर अवैध आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २ आॅगस्टला राजेश डागा यांना झोन क्रमांक १ च्या सहायक आयुक्तांकडून नोटीस पाठविण्यात आली. ही नोटीस डागा यांना मिळाली असून त्यांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या अवधीत डागा यांना दस्तऐवज पुराव्यासह लेखी उत्तरे सादर करायची आहेत. १५ दिवसांच्या आत या कारणे दाखवा नोटीसचे उत्तर न दिल्यास ते अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल व अशा कारवाईचा खर्च त्यांच्या जवळून वसूल करण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे. तत्कालिन आयुक्तांनी आपल्याला वाढीव एफएसआय दिला होता. त्यामुळे आपण अतिरिक्त बांधकाम केलेले नाही, असे डागा यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र त्याबाबतचा कुठलाही शासन निर्देश अप्राप्त असल्याने ते बांधकाम अनधिकृतच आहे, असा आयुक्तांचा दावा आहे. (प्रतिनिधी)जागतिक दर्जाची इमारत अनधिकृतडागा सफायर या निर्माणाधिन इमारतींमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येतील, या तीनही इमारती जागतिक दर्जाशी बरोबरी करणाऱ्या असतील, अशी आकर्षक जाहिरात डागा यांच्याकडून करण्यात आली. या भुलथापांना बळी पडून त्यांनी ग्राहक मिळविले. मात्र, अनधिकृत आणि अवैध बांधकाम करुन डागा जागतिक दर्जाची इमारत उभारण्याचा दावा कसा करु शकतात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अनधिकृत बांधकाम का पाडू नये?तीनही इमारतींमध्ये करण्यात आलेले अवैध आणि अनधिकृत बांधकाम का पाडून टाकण्यात येऊ नये, अशी नोटीस डागा सफायरला पाठविण्यात आली आहे. १५ दिवसांच्या आत लेखी खुलासा न मिळाल्यास आणि त्यांनी ते स्वत: न पाडल्यास न्यायालयीन निर्देशांनुसार ते बांधकाम पाडून टाकण्यात येईल, अशी नोटीस झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी डागा यांना पाठविली आहे. डागा सफायरच्या ए, बी आणि सी या तीनही इमारतींमध्ये परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम करण्यात आल्याने नोटीस बजावण्यात आली. यात कुठलीही तांत्रिक चूक नाही. ते बांधकाम अवैध आणि अनधिकृतच आहे.-हेमंत पवार, महापालिका आयुक्त
डागा सफायरच्या तीनही इमारती अनधिकृतच
By admin | Updated: August 5, 2016 23:54 IST