दर्यापूर : आंबेडकरी चळवळीचे नेते तथा बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल रा.सू.गवई यांच्या पार्थिवार रविवारी शासकीय इतमामात दारापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अंत्यसंस्कार पार पडले. यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम ऋृणमोचन येथे झाला. दादासाहेबांचे मोठे चिरंजीव न्या. भूषण गवई व राजेंद्र गवई यांनी दादासाहेबांच्या अस्थी व राख गोळा करुन विधीवत पूजन केले. यानंतर गवई कुटुंबीयांचे कुलदैवत असलेले इकंदर महाराज यांच्या मंदिराजवळील पूर्णा नदी तिरावर नदीत दादासाहेबांच्या काही अस्थी त्यांच्या कुटुंबीयांनी विसर्जित केल्या. कारण याच ठिकाणी दादासाहेब लहान असताना पूर्णा नदीत पोहण्याचा आनंद घेत होते. त्यांचे पूर्णेवर विशेष प्रेम असून त्यांच्या मुंबईतील घराला त्यांनी पूर्णा नाव दिले आहे. यानंतर राजेंद्र गवई व न्या. भूषण गवई व त्यांचे नातवंड करण-अर्जुन यांनी दादासाहेबांच्या अस्थीकलश संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋृणमोचन येथे आणला. (प्रतिनिधी)
दादासाहेबांच्या अस्थी ऋृणमोचन येथे विसर्जित
By admin | Updated: July 28, 2015 00:44 IST