शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सिलिंडर बनले गॅस बॉम्ब ?

By admin | Updated: January 22, 2017 00:02 IST

शहरात पंधरवड्यात घडलेल्या सिलिंडर भडक्याच्या तीन घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्फोटांची मालिका : घरात आम्ही सुरक्षित किती ? वैभव बाबरेकर अमरावतीशहरात पंधरवड्यात घडलेल्या सिलिंडर भडक्याच्या तीन घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तांत्रिक सदोषता, नियमित तपासणीचा अभाव आणि ग्राहकांना अपुरे मार्गदर्शन यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गॅस वितरकांकडूनच ग्राहकांच्या सिलिंडरच्या सुरक्षेसंबंधित योग्य ती प्रक्रिया राबविली जात नसून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जिल्हा प्रशासनसुद्धा आपल्या जबाबदारीतून हात झटकत आहेत. जिल्हाभरात विविध कंपन्यांचे ४१ गॅस वितरक आहे. ते तब्बल ४ लाख ५० हजार ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचवितात. गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या वितरकांची असते. त्यांचे हे कार्य त्यांनी नेमलेल्या 'डिलिव्हरी बॉय'ची असते. ग्राहकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविल्यानंतर संबंधित 'डिलिव्हरी बॉय'ने त्या सिलिंडरचे वजन, गॅस लिकेज तपासून घेणे आवश्यक आहे. सर्व अचूकतेची खातरजमा झाल्यानंतर सिलिंडर शेगडीला जोडून देणे, शेगडीची ज्योत व्यवस्थित पेटते आहे किंवा नाही, हे तपासून बघणे बंधनकारक आहे. मात्र, यापैकी एकही बाब 'डिलिव्हरी बॉय' करीत नाही. ग्राहकांना मार्गदर्शनदेखील केले जात नाही. पंधरवड्यात शहरातील तीन ठिकाणी घरगुती गॅस गळती होऊन भडका उडाला. नवसारीतील एका हॉटेल टपरीवर सिलिंडरचा भडका उडाला. या अचानक झालेल्या स्फोटामुळे एका विद्यार्थिंनीचा मृत्यू झाला, तर दुसरीदेखील गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. शुक्रवारी रविनगरात झालेल्या सिलिंडरच्या भडक्याने दोन महिलांसह एक चिमकुली भाजली गेली. डीएसओ, कलेक्टर यांचीही जबाबदारी!वितरकांनी सिलिंडरच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे काटेकोर पालन केले जाते की नाही याकडे लक्ष पुरविले असते. ग्राहक जागृती करण्यासंबंधी नियमित पावले उचलली असती, तर गॅस भडक्याने गेलेला तरुणीचा जीव आणि इतरांना झालेली शारीरिक हानी टळू शकली असती. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अखत्यारित जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे हे कार्यरत आहेत. रांगेने तीन अपघात घडलेत. पुरवठा विभाग हललाही नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची खरे तर झोप उडायला हवी होती. वानखडेंच्या संवेदना बोथट झाल्या असतील तर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या अत्यंत गंभीर मुद्याची स्वत:हून दखल घ्यायलाच हवी. घराघरांतील सिलिंडर्स गॅस बॉम्ब बनलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अस्वस्थ होऊ नये काय ? गॅस सिलिंडरच्या सुरक्षेची जबाबदारी गॅस वितरकांची आहे. अपघातानंतरची तपासणी गॅस कंपनीच्या एरिया सेल्समनची जबाबदारी आहे. आमचा संबंध केवळ पुरवठ्याच्या आकडेवारीशी आहे. गॅस वितरकांची बैठक बोलविली आहे. - डी.के.वानखडे,जिल्हा पुरवठा अधिकारीसिलिंडरची डिलिव्हरी करताना रिक्षावाल्यांनी तपासणी केलेलेच सिलिंडर ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. ग्राहकांनीही आपली जबाबदारी समजून सिलिंडरची तपासणी करून घ्यावी. या घटनेच्या अनुषंगाने 'डिलिव्हरी बॉईज्'ची बैठक बोलावून त्यांना कडक सूचना देण्यात येतील.- संजय देशमुख, अध्यक्ष,अमरावती गॅस डिस्ट्रिब्युटर असोशिएशन