लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना वन्यजीव विभागाच्या जारिदा वनपरिक्षेत्रात ८४ हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे.गतवर्षी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत सुमारे २५५ हेक्टर क्षेत्रात सीताफळ, आवळा, बेहडा, बांबू, बोर, मोहा अशा विविध प्रजातींची प्रतिहेक्टरी १,१११ याप्रमाणे एकूण २ लाख ८४ हजार रोपांची लागवड विविध १५ ठिकाणी करण्यात आली होती. त्यापैकी उन्हाळ्यात मृत झालेल्या रोपांच्या ठिकाणी यंदा नवीन रोपे लावण्याचे काम ८० टक्के झाले आहे. बांबू रोपांचे रानडुकरांनी नुकसान केल्याने यंदा चिंच, आवळा, मोहा, कडुनिंब व करंज प्रजातींवर भर दिली जात आहे. जारिदा, मेहरीआम, चुनखडी, खडीमल, खंडुखेडा, माडीझडप वर्तुळात जारिदा वनपरिक्षेत्राधिकारी आशिष मोळेकर, आर.बी. तनपुरे, वर्तुळ अधिकारी एस.व्ही. भोंडे, एस.टी. सोनुने, ए.जी. चक्रवर्ती, ए.एस. येवलेंसह वनकर्मचारी व आदिवासी मोहिमेत सहभागी झाले.
जारिदा परिक्षेत्रातील जंगलात सीताफळ, आवळा, हिरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST
२ लाख ८४ हजार रोपांची लागवड विविध १५ ठिकाणी करण्यात आली होती. त्यापैकी उन्हाळ्यात मृत झालेल्या रोपांच्या ठिकाणी यंदा नवीन रोपे लावण्याचे काम ८० टक्के झाले आहे. बांबू रोपांचे रानडुकरांनी नुकसान केल्याने यंदा चिंच, आवळा, मोहा, कडुनिंब व करंज प्रजातींवर भर दिली जात आहे.
जारिदा परिक्षेत्रातील जंगलात सीताफळ, आवळा, हिरडा
ठळक मुद्दे८४ हजार रोपांची लागवड : हेक्टरी १,१११ वृक्षारोपण