शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

सद्गुणांच्या पाठीशी उभी ठाकली संस्कृती !

By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST

शांत अमरावतीत शुक्रवारी लहर उठली. प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण असलेले अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीला विरोध करण्यासाठी ....

लोकमत प्रासंगिक- गणेश देशमुखशांत अमरावतीत शुक्रवारी लहर उठली. प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण असलेले अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीला विरोध करण्यासाठी सरसावलेल्या अमरावतीकरांच्या आत्मक्लेशाची ती लहर होती. कातडी जाळणाऱ्या उन्हात पुरुषांच्या बरोबरीने महिला, मुले, मुली, ज्येष्ठ नागरीक आणि अपंगांनीही बदलीला विरोध करणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग दर्शविला. तीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी केली. गुरुवारी सायंकाळी गुडेवार यांची बदली झाल्याची अधिकृत वार्ता महापालिकेत मंत्रालयातून धडकली. साऱ्यांच्याच नजरा फॅक्सकडे लागल्या होत्या. फॅक्स आला की, गुडेवार जाणार, हे निश्चित होते. गुडेवारांनी निवासस्थानी आवश्यक त्या फाईली हातावेगळ्या करण्यासाठी बोलवून घेतल्या होत्या. बदली झाली; आदेशाची प्रतीक्षा तेवढी असल्याचे महापालिका कार्यालयातून सांगण्यात आले होते. बदलीचे संकेत मंत्रालयातून दिले गेले होते, त्यामुळेच हे सारे घडले होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतरही गुडेवारांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमलेली होती. शहराप्रती आस्था ठेवणारी मंडळी शुक्रवारी सकाळपासूनच राजकमल चौकात एकत्रित आली. गुडेवारांची बदली आम्ही होऊच देणार नाही, असा निर्धार तेथे करण्यात आला. दिवसभर हा लोकरेटा कायम होता. घाई झाल्यामुळे शुक्रवारी शहर बंद करण्याऐवजी शनिवारी बंद पुकारण्याचा निर्णय झाला. घोषणा झाली. दहा हजार पत्रके शहरभर वाटली गेलीत. हे सारे सुरू असताना अनेकांनी मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे त्यांची भावना कळविली. गुडेवार आम्हाला हवे आहेत, या अशायाची अनेक निवदने, पत्रे सीएमओला पाठविण्यात आलीत. आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभीमान संघटनेने दुपारी गुडेवारांच्या बदली स्थगितीसाठी रॅली काढली. शहरात आज दिवसभर स्पंदने जाणवत होती. एका अधिकाऱ्याचा मुक्काम वाढावा म्हणून शहर कसे जीवंत झाले होते. अमरावती शहराच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. अधिकाऱ्यासाठी लोकांची हृदये धडकत होती. चांगुलपणावर विश्वास ठेवणारी, प्रेम करणारी मंडळी अमरावतीत आहेत, हेच आज पुन्हा सप्रमाण सिद्ध झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत अच्च्युत महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख, दाजीसाहेब पटवर्धन, दादासाहेब खापर्डे, अंबादासपंत वैद्य, सुदामकाका देशमुख, बी.टी.देशमुख- कर्तृत्त्वाच्या नभात चकाकणारी ही रत्ने ज्या जिल्ह्याच्या मातीत घडलीत, त्या मातीत जगणारा सामान्य माणूसही तसाच आहे- संवेदनशील अन् सुगंधी, हे आज जगाला बघता आले. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अशी भूषणावह बिरुदावली मिरवणाऱ्या इंद्रपुरीच्या शानशौकतीत आजच्या उत्स्फूर्त लोकलढ्याने चार चांद लागले!गुडेवार- कोण, कुठले? काय नाते अंबानगरीशी त्यांचे? आले काय नि गेले काय? असाही विचार होऊ शकला असता; पण माणूस बघून प्रेम करणारा, स्वार्थ बघून जीव लावणारा हा जिल्हा नाही. चांगुलपणावर जीवन उधळणारा हा जिल्हा! गुडेवार हे चांगुलपणाचे, प्रामाणिकपणाचे, कर्तव्यकठोरतेचे चालते-बोलते उदाहरण. जगभर फिरलो तरी या शहरातील स्मशानातच आम्ही विसावणार आहोत, हा विचार अमरावतीवासियांचा. गुडेवारांच्या पाठीशी उभा ठाकलेला लोकरेटा अर्थात् सद्गुणांच्या पाठीशी उभी ठाकलेली संस्कृतीच! गुडेवारांना नेण्याचे धाडस बहुदा लोकभावनेच्या या भरीव प्रदर्शनानंतर शासन करणारही नाही. परंतु गुडेवार कायम राहिलेच तर त्यांची जबाबदारी पूर्वीच्या तुलनेत कैकपटीने वाढलेली असेल. शहर कायमस्वरुपी आठवणीत ठेवेल, अशी काही 'यादगार' बात गुडेवारांच्या कारकीर्दीत अंबानगरीवासियांसाठी घडल्यास लोकप्रेमाचा तो सन्मान ठरेल!