शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

विकृती निस्तरण्यासाठी सांस्कृतिक कोंदण हवे !

By admin | Updated: October 5, 2015 00:38 IST

'तू माझी झाली नाहीस, तर कुणाचीच नाही, अशी दर्पोक्ती आज प्रेमात केली जाते. ही विकृती कायद्याच्या टाचेखाली चिरडून संपुष्टात येणार नाही, ...

उज्ज्वल निकम : स्त्री शक्ती पुरस्काराचे वितरणअमरावती : 'तू माझी झाली नाहीस, तर कुणाचीच नाही, अशी दर्पोक्ती आज प्रेमात केली जाते. ही विकृती कायद्याच्या टाचेखाली चिरडून संपुष्टात येणार नाही, ती विकृती निस्तरण्यासाठी सांस्कृतिक कोंदण हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.राजमाता अहिल्या देवी फाऊंडेशनच्यावतीने रविवारी दुपारी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्ज्वला हावरे, प्रशासकीय अधिकारी संगीता धायगुडे, मेळघाटातील वैरागडच्या समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे तथा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके यांना अहिल्यादेवी 'स्त्री शक्ती' पुरस्काराने गौरविण्यात आले.टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांवर भाष्य करताना पालकांनी त्यांच्या पाल्यांची काळजी घेण्याचे आवाहन उज्ज्वल निकम यांनी केले. बेछुट गोळीबार करणारी पिढी जरी येथे जन्माला यायची असली तरी माथेफिरु प्रेमविरांची कमी नाही, त्यामुळे तर्काला छेद देणाऱ्या मालिकांपासून या पिढीला वाचविण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पैशाची श्रीमंती हे अळवावरचं पाणी तर मनाची श्रीमंती शिंपल्यातले मोत्यासारखी आहे. म्हणूनच मनाची श्रीमंती जपा असे आवाहन निकम यांनी केले. आज ज्या पाच हिरकणींचा येथे सत्कार केला गेला, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, शिका मी आणि माझा देश, अशी संकल्पना रुजवा. आज असा एकही गँगस्टर नाही, जो मला झुकून सलाम करीत नाही. त्यामुळे मी आज स्वत:ला कायदेक्षेत्रातील डॉन मानतो, यासाठी आत्मविश्वास जागवावा लागतो, अशा शब्दांत निकम यांनी आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले. हा पुरस्कार सोहळा भोसले सभागृहात झाला. डॉ. रवींद्र कोल्हे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.