दिवसभर प्रखर उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर सायंकाळी अचानक आभाळ काळय़ाशार ढगांनी आच्छादून गेले. वार्याच्या थंडगार झुळुकीने अमरावतीकर मोहरले. जीवाची काहिली होत असताना वातावरणातील हा बदल कोणाला नको असेल? शहराबाहेरील सुपर एक्स्प्रेस हायवेवरून आकाशाकडे बघताना उदास धरित्रीच्या भेटीला जणू काही उताविळ मेघ धावून आल्याचा भास होतो.
घन दाटले.दाटले.
By admin | Updated: May 19, 2014 23:05 IST