शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी रुपयांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:13 IST

डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे.

ठळक मुद्दे२८,००० मनुष्यदिवस नष्ट

डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे.डेंग्यू तसा जीवघेणा आजार असला तरी सहज नियंत्रणात आणता येऊ शकेल इतका तो मानवी मर्यादेत आहे. डेंग्यूचा फैलाव करणारे माध्यम म्हणजे स्वच्छ पाण्यावर आढळणारे डास. सकाळी सक्रिय होणारे हे डास नियंत्रणात आणणे हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. त्यानंतरही डेंग्यू झालाच, तर वैद्यकीय चिकित्सकाच्या देखरेखीत तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.महापालिका आयुक्तपदाच्या अधिकाऱ्याने प्रशासन कौशल्य वापरून वेळोवेळी योग्य ते आदेश देणे आणि आदेशांचे पालन झाले की नाही, याची खातरजमा करणे इतकेदेखील काम न चुकता रोज केले तरी डासांवर नियंत्रण मिळविणे आणि डेंग्यूरूपी राक्षसाचा नायनाट करणे शक्य आहे. तथापि, आयुक्त संजय निपाणे यांनी गरजेपेक्षा जास्त सोज्वळपणा दाखविल्याने त्यांचे हे प्रशासकीय वागणे आता अमरावतीकरांच्या प्राणांवर बेतू लागले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारत दौºयावर असताना त्यांच्या वास्तव्यादरम्यान येथील प्रदूषणाने त्यांचे तीन दिवसांचे आयुष्य कमी झाल्याचा निष्कर्ष काढण्याइतपत आरोग्यक्षेत्र विकसित झाले आहे. इकडे केवळ डासांची पैदास न रोखल्यामुळे महानगरातील लोक पटापट मरून पडले. किमान एक कोटी रुपयांचे आणि २८ हजार मनुष्यदिवसांचा चुराडा असे राष्ट्राचे नुकसान झाले. लक्षावधी लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाºया पदावर विराजमान प्रमुख अधिकारी संवेदनशील आणि निर्णयक्षम असल्यास सामान्यजनांना त्याचा लाभ आणि निर्णयक्षमता नसलेला असल्यास त्याचा तोटा किती, या दोन्ही बाबी यातून स्पष्ट व्हाव्यात.शहरात किमान हजार स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली. महापालिका, शासन आकडे लपवित असली तरी 'लोकमत'ने शोधमोहीम राबवून शहरातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चेअंती हा आकडा मिळविला आहे. खरे तर डॉक्टरांच्या मते हा आकडा याहीपेक्षा बराच जास्त आहे. तथापि, बाधितांची किमान संख्या केवळ हजारच गृहीत धरली तरी प्रत्येक रुग्णाला औषधी, चाचण्या, इस्पितळाचे, डॉक्टरांचे शुल्क असा कमीत कमी १० हजार रुपये खर्च येतो. हजार लोकांसाठी एक कोटी रुपये व्यर्थ गेलेत. डेंग्यूबाधित रुग्णाला किमान १४ दिवस विश्रांती घ्यावीच लागते. याप्रमाणे हजार रुग्णांचे १४ हजार दिवस आणि देखभालीसाठी असलेली एका रुग्णामागे एक व्यक्ती याप्रमाणे हजार रुग्णांमागे हजार व्यक्तींचे १४ हजार दिवस असे एकूण २८ हजार मनुष्यदिवस असे राष्ट्राचे नुकसान झाले. हजारपैकी गंभीर रुग्णांची आकडेवारी पाच टक्के इतकी आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू