शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पतीची आधी केली हत्या, नंतर फासावर लटकविले; आत्महत्येचा बनाव केला पण..

By प्रदीप भाकरे | Updated: October 5, 2023 18:14 IST

आरोपी पत्नीला अटक, हंतोडा येथील घटना

अमरावती : कौटुंबिक कलहातून पत्नीने पतीची बेलण्याने जबर हल्ला चढवून हत्या केली. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु, शवविच्छेदन अहवालावरून सहा दिवसांनी तिचे बिंग फुटले. ही घटना २९ सप्टेंबर रोजी अंजनगाव सुर्जी ठाण्याच्या हद्दीतील हंतोडा येथे घडली. या प्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

नीलेश शंकरराव इंगळे (३५, रा. हंतोडा असे मृतक तर जया नीलेश इंगळे (३२, रा. हंतोडा) असे अटक  आरोपीचे नाव आहे. नीलेश व जया यांच्यात नेहमी कौटुंबिक कारणावरून वाद होता.  २९ सप्टेंबर रोजीही त्यांच्यात वाद उद्भवला. या वादात जयाने पती नीलेशवर बेलण्याने हल्ला चढविला. त्यात नीलेशचा मृत्यू झाला. त्यानंतर जयाने पती नीलेश यांनी राहते घरी अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करून अंजनगाव सुर्जी पोलिसांना माहिती दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास आरंभला. पंचनाम्यादरम्यान मृतक नीलेशच्या शरीरावर रक्ताचे डाग व मारहाणीच्या खूणा दिसून आल्याने पोलिसांना संशय आला. त्यात मृतक नीलेशच्या आई-वडिलांनीही मुलाची हत्या करून गळफास लावल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. 

पीएम रिपोर्टने फोडले बिंग

शवविच्छेदन अहवालावरूनही जबर मारहाणीमुळे नीलेशचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मृतक नीलेशचे वडील शंकरराव त्र्यंबक इंगळे (७०, रा. हंतोडा) यांची तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी बुधवारी आरोपी जया इंगळेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद धाडसे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारAmravatiअमरावती