शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परतवाड्यात लॉकडाऊनपूर्वी खरेदीसाठी ग्रामिणांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST

भागमभाग, कोरोनाची दहशत, धारणी वगळता बसफेऱ्या बंद परतवाडा : अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात सोमवारी रात्री ८ पासून ...

भागमभाग, कोरोनाची दहशत, धारणी वगळता बसफेऱ्या बंद

परतवाडा : अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात सोमवारी रात्री ८ पासून लॉडाऊन लागण्यापूर्वी दिवसभर येथील बाजारपेठेत ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते गर्दीने फुलून गेले.

शनिवारी सायंकाळपासून बंद असलेली दुकाने सोमवारी सकाळी उघडताच चारही तालुक्यांतील ग्रामीण भागातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. येथील जयस्तंभ ते गुजरी बाजार चिखलदरा अंजनगाव स्टॉप, आठवडी बाजार, बस स्थानक परिसरात तोबा गर्दी होती.

बॉक्स

किरकोळ विक्रेत्यांची खरेदी

चिखलदरा, चांदूर बाजार, धारणी, भैसदेही या अचलपूर तालुक्याला लागून असलेल्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसह किराणा, कटलरी, फळे, पालेभाज्या, अंडी व इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी लॉकडाऊनपूर्वी खरेदीसाठी परतवाडा शहर गाठले. आठवडाभराची खरेदी करून विविध वाहनांनी ते गावी जात असल्याचे चित्र दिसून आले.

बॉक्स

बस फेरी बंद

सोमवारी रात्री ८ पासून अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांत लॉकडाऊन घोषित केल्याने येथील बस स्थानकातून पुढील आदेशापर्यंत धारणी तालुका वगळता जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या ३०० हून अधिक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज सहा लाख रुपयांचा तोटा परतवाडा बस स्थानक प्रशासनाला सहन करावा लागणार आहे. सोमवारी दिवसभर खासगी व एसटी महामंडळाच्या बसने ये-जा करणाऱ्यांची गर्दी दिसून आली.