शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार,  प्रायोगिक तत्त्वावर तपासले आठ जिल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:31 IST

राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने (कॅग) लेखाआक्षेप नोंदविले आहेत. त्यानंतर बृहत आराखडा व योजनांमध्ये सुधारणा करू, असे शासनाने मान्य केले.

 -गणेश वासनिक अमरावती - राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने (कॅग) लेखाआक्षेप नोंदविले आहेत. त्यानंतर बृहत आराखडा व योजनांमध्ये सुधारणा करू, असे शासनाने मान्य केले. परंतु ‘कॅग’च्या अनुपालनात राज्य शासन नापास झाले असून, दोषींवर अद्यापही कारवाई नाही, असे अहवालात नमूद आहे. शासनाने दलितवस्तीत पाणीपुरवठा, मलनि:सारण, पोच रस्ते, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, समाजमंदिर, आवास आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन १९७४ मध्ये ‘दलितवस्ती सुधार योजना’ अंमलात आणली. त्याचे डिसेंबर २०११ मध्ये ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास’ असे नामकरण करण्यात आले. ‘कॅग’ने योजनेसंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर अकोला, औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, लातूर, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे या आठ जिल्ह्यांतील विकासकामांचे लेखापरीक्षण केले. यामध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले. १६ तालुक्यांतील ८० ग्रामपंचायतींनी योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आक्षेप ‘कॅग’ने मार्च २०१५ मध्ये नोंदविला. त्यानंतर शासनानेदेखील ही बाब मान्य करीत ‘कॅग’ने सुचविलेल्या अनुपालनाची अंमलबजावणी केली जाईल, अशी कबुली दिली. तथापि, दीड वर्षांत भ्रष्टाचारप्रकरणी कुणावरही कायदेशीर कारवाई केलेली नाही. खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योजनांमध्ये भ्रष्टाचार किंवा अपहार झाला असेल, तर ही बाब पंचायत राज समितीने (आॅडिट लोकल फंड) शासनाच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये आॅडिट लोकल फंडची स्वतंत्र निर्मिती आहे. परंतु, आॅडिट लोकल फंडकडून या भ्रष्टाचाराबाबत 'शब्द'देखील बाहेर आलेला नाही. (क्रमश:)    डीपीआर समानतेअभावी जास्त अनुदानाचे वाटप    दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सन २००८ ते २०१३ दरम्यान विकासकामे करताना प्रथम बृहत् आरखडा (डीपीआर) सन २००८-२००९ पासून क्रियाशील होता. तथापि, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने पंचवार्षिक डीपीआर तयार करण्यासाठी कोणतेही प्रमाण प्रपत्र नेमून दिले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समित्यांच्या डीपीआरमध्ये समानता नव्हती. ग्रामपंचायतीसुद्धा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवू शकल्या नाहीत. यामुळे मंजुरीपेक्षा जास्त अनुदान देण्यात आले, असे ‘कॅग’ने अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती