फोटो पी २१ माहुली चोर
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील माहुली चोर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अतिवृष्टीमुळे खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील जळू नाल्याला या महिन्यात तीन वेळा पूर आला. पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांत घुसले, तसेच शेतालगत असलेल्या लहान-लहान नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतजमिनी खरडून गेल्या व पिकांचे नुकसान झाले. जोरात पडलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतांतील बांध फुटले. पिके जळाली. बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली.
कधी जोराचा पाऊस, तर कधी बरेच दिवस पावसाचा खंड व पुन्हा जोरात पडलेल्या पावसामुळे पिके दडपली गेली. या परिसरातील झालेल्या शेतीचे व पिकांच्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
(माहुली चोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून गेल्या. शेताचे बांध फुटले. पिके दडपल्ली गेली. पिकांचे नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
राजेंद्र सरोदे,
ग्रामपंचायत सदस्य, माहुली चोर)
210721\img-20210721-wa0039.jpg
माहुली चोर परिसरात झालेल्या पावसामुळे शेतीचे व पिकाचे नुकसान.