नकाशात अडकले पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:01:01+5:30

राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभिलेख कार्यालयाने केवळ दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना शेतजमीन चतु:सीमा नकाशा दिला आहे.

Crop loans stuck on the map | नकाशात अडकले पीक कर्ज

नकाशात अडकले पीक कर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देधामणगावात आठ हजार शेतकरी : राष्ट्रीयीकृत बँकेची अट घेतेय जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : सात-बारावर सर्व नोंदी, फेरफाराची नोंद असताना यंदा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकाद्वारे पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशा मागितला जात आहे. भूमिअभिलेख कार्यालयात केवळ दोन कर्मचारी असल्याने नकाशाअभावी तालुक्यातील आठ हजार शेतकरी पीक कर्जपासून अद्याप वंचित आहेत.
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्जवाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १४ मे २०२० रोजी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती. यामध्ये शेतकऱ्यांना अधिक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आधार कार्ड, सात-बारा, ८-अ, फेरफार, छायाचित्रासोबतच तलाठ्याकडून जमिनीचा हातनकाशा किंवा तलाठी यांनी जमिनीची हद्द नमूद करून दिलेला चतु:सीमा नकाशा अशी कागदपत्रे शेतकऱ्यांकडून घ्यावीत, असे आदेश राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. सोबतच १ लाख ६० हजारांवर कर्ज घ्यायचे असेल, तर ई-करार व लीगल सर्च रिपोर्ट घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
एकीकडे एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांनी आदेश काढून तलाठ्याकडून कोणताही हातनकाशा किंवा जमिनीबाबत हाताने लिहिलेली कागदपत्रे घेतली जाऊ नये, असा आदेश काढले. दुसरीकडे १४ मे रोजी काढलेल्या पत्रात तलाठ्यांमार्फत हातनकाशा घेण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कधी तलाठ्याकडे, तर कधी तर तहसील कार्यालयात चकरा घालत आहेत. यादरम्यान काही ठिकाणी खरिपातील दुबार पेरणीही झाली. शेतकºयांना मात्र अपेक्षित कर्ज मिळालेले नाही.

भूमिअभिलेख कार्यालयात अर्जांचा ढीग
राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभिलेख कार्यालयाने केवळ दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना शेतजमीन चतु:सीमा नकाशा दिला आहे. हे काम केवळ दोन कर्मचारी करीत असल्याने शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा घालाव्या लागत आहेत. यामुळे भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांची गर्दी एकाच वेळी या कार्यालयात होते. एवढ्या शेतकऱ्यांना नकाशा देणे अवघड होते. एका दिवशी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना नकाशा देत आहोत.
- व्ही.व्ही. राणे
उपअधीक्षक

तीन ते चार दिवसांपासून भूमिअभिलेख कार्यालयात गर्दी होत आहे. यामुळे नकाशा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही अट रद्द करणे गरजेचे आहे. या अटीमुळे अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहतील.
- रामराव अतकरे, शेतकरी

Web Title: Crop loans stuck on the map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.