शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पीकविमा; ३८ हजार शेतकऱ्यांनी टाळला सहभाग; ३१ जुलै रोजी संपली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:12 IST

Amravati : यंदा ४.७३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पीकविमा योजनेत एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अंतिम दिवशी म्हणजेच ३१ जुलैपर्यंत ४७३२४५ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग नोंदविला आहे. त्यातुलनेत गतवर्षी ५,१०,०३३ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग घेतला होता. परतावा टाळाटाळ होत असल्याने देण्यात ३२,५७४ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग टाळला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येतो. योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपया भरून पीकविमा संरक्षण प्राप्त होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबींचा पीकविम्यात समावेश करण्यात आला आहे. योजनेची मुदत १५ जुलै होती. मात्र, याचदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी केंद्रांमध्ये गर्दी होती व अनेक सेतू चालकांनी सीएससी केंद्रांचे परवाने घेतले आहेत. त्यामुळे केंद्रातील गर्दीमुळे योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८९.२१ टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे.

पीकविमा जिल्हास्थिती                                                २०२३                    २०२४शेतकरी संख्या                         २,३४,५२५               २,६७,०९९                       कर्जदार शेतकरी                          ४००९                   ४,२१९बिगर कर्जदार                           ४,६९,२३६             ५,०५,८१४एकूण अर्ज प्राप्त                        ५,१०,०३३              ४,७३,२४५

पीकविमा काढलेले तालुकानिहाय शेतकरीअचलपूर तालुक्यात २६,०७५, अमरावती ३५,७२३, अंजनगाव सुर्जी ३५,६३४, भातकुली ४३१७३, चांदूर रेल्वे ३२,८६३, चांदूरबाजार ३२,१६२, चिखलदरा ६७६७, दर्यापूर ६३.५७३, धामणगाव रेल्वे ३७,२०९, धारणी १३,७८९, मोर्शी ३६,४४३, नांदगाव खंडेश्वर ६१,७१३, तिवसा २७,५५८ व वरुड तालुक्यात २०,५७३ जणांनी खरिपाचा पीकविमा काढला आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती