शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

क्रौंच पक्ष्यांनी केलाय विक्रम!

By admin | Updated: February 1, 2015 22:48 IST

दयार्पूर तालुक्यात तब्बल ९५७ च्या विक्रमी संख्येत क्रौंच पक्षी दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना आढळून आलेत. इतक्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्ष्यांची

अमरावती : दयार्पूर तालुक्यात तब्बल ९५७ च्या विक्रमी संख्येत क्रौंच पक्षी दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना आढळून आलेत. इतक्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्ष्यांची महाराष्ट्रात पहिल्यांदा तर भारत व आशियात दुसरी नोंद करण्यात आली आहे.दॅमझील के्रन नावाने ओळखला जाणारा हा पक्षी आपल्या भागात युरेशिया, सायबेरिया, डेन्मार्क, जर्मनी, ग्रीस व रोमानिया या देशातून स्थलांतर करून येतो. यांचे स्थलांतर सगळ्यात कठीण मानले जाते. आॅगस्ट ते सप्टेबर महिन्यात हे एकत्र येऊन समूहाने उडाण भरतात. साधारणत: १६ हजार ते २६ हजार फूट उंचीवरून उडत हिमालय पर्वतरांगा पार करून आपल्या भागात येतात. मार्च महिनादरम्यान ते परतीच्या प्रवासाला लागतात. हे पक्षी नेहमी समूहाने राहत असून यांचे स्थलांतर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. डोक्यावर व पोटावर लांब काळ्या रंगाची पिसे व झुपकेदार काळ्या रंगाचे शेपूट आणि सर्व शरीर राखाडी रंगाचे असून हे दिसायला अतिशय सुंदर असतात. गर्द लाल रंगाचा डोळ्यामुळे आकर्षक दिसतात. क्रेन प्रकारातील हा सगळ्यात लहान क्रेन पक्षी असून यांचा पंखांचा विस्तार १५५ ते १८० सेमी असतो. अमरावती जिल्ह्यातील तलावावर क्रौंचचे आगमन हे समृध्द पर्यावरणाचे प्रतिक असल्याचे मत पर्यावरण प्रेमी व पक्षी मित्राचे आहे. (प्रतिनिधी)