शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST

अमरावती : गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईदरम्यान अभियंते, कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्कीचे ...

अमरावती : गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईदरम्यान अभियंते, कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्कीचे प्रकार होत आहेत. अशाप्रकारे मारहाण तसेच कार्यालयांची तोडफोड करून नासधूस झाल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सरकारी कामात अडथळा (कलम ३५३), कर्मचाऱ्यांशी वाद, अपशब्द (कलम ५०४), धमकी (कलम ५०६), मारहाण (कलम ३३२व ३३३), कार्यालयात जबरीने प्रवेश करून तोडफोड (कलम ४२७), सरकारी मालमत्तेचे नुकसान, कार्यालयात गोंधळ (कलम १४३, १४८ व १५९), अनधिकृत जमाव (कलम १४१ व १४३) आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमांन्वये कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमांन्वये २ ते १० वर्षे कारावासाची तरतूद आहे.

जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अमरावती शहर विभागात ४, अमरावती ग्रामीण विभागात ७, अचलपूर मध्ये १, तर मोर्शी विभागात ३ ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांकडून मारहाण झाली आहे. अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व सर्व विभागीय कार्यकारी अभियंत्यांकडून कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.