शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गुन्हे शाखेने केली गजानन आत्रामला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:07 IST

घरफोडी, चोरीतील कुख्यात आरोपी गजानन आत्रामसह त्याचा साथीदार शकंर सुभाष बनसोड (रा.भिमनगर) याला अटक केली. आरोपींकडून रामपुरी कॅम्प स्थित मंदिरातून चोरी गेलेल्या रक्कमेपैकी सात हजारांची रोख पोलिसांनी जप्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरफोडी, चोरीतील कुख्यात आरोपी गजानन आत्रामसह त्याचा साथीदार शकंर सुभाष बनसोड (रा.भिमनगर) याला अटक केली. आरोपींकडून रामपुरी कॅम्प स्थित मंदिरातून चोरी गेलेल्या रक्कमेपैकी सात हजारांची रोख पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.दोन दिवसांपूर्वी रामपुरी कॅम्प स्थित श्री कटणीवाले बाबा यांच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोराने दिड लाखांची रोख लंपास केल्याची तक्रार अनिल सुकनमल झामणणी (रा. कृष्णानगर गल्ली क्र.४) यांनी गाडगेनगर ठाण्यात नोंदविली. तपासानंतर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी झाली. दरम्यान दोन चोरटे दानपेटीतील पैसे चोरताना आढळून आले. सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर दानपेटीतील पैसे चोरणारा गजानन आत्राम नामक आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गाडगेनगरसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजानन आत्रामचा शोध सुरु केला. गजानन आत्राम हा मद्यपी असल्यामुळे, त्याने घटनेच्या रात्री गौतम नगरात गोंधळ घातल्याचीही माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवंड, एएसआय विनोद गाडेकर, पोलीस शिपाई विजय पेठे, अजय मिश्रा, दीपक दुबे, नीलेश पाटील, उमेश कापडे, पवन घोम यांच्या पोलिसांचे पथक गजाननचा शोध घेत असताना, तो रविवारी दारुच्या दुकानात आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला.तडीपार, एमपीडीए कारवाई होण्याची शक्यतागजानन आत्राम याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात तब्बल २१ गुन्ह्याच्या नोंदी असून, त्याच्याविरुध्द तडीपारीची किंवा एमपीडीएची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी