लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांनी कृषिसेवा केंद्रांतून विकत घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी शिराळा येथील दोन कृषिसेवा केंद्र संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी नोंदविला. अशा प्रकारचा गुन्हा नोंदविण्याची ही जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील ही पहिलीच घटना आहे. फसवणुकीची ही घटना ७ जून ते १२ जुलै दरम्यान घडल्याची पोलीसदप्तरी नोंद आहे.पोलीस सूत्रांनुसार, शिराळा येथील भारत कृषिसेवा केंद्र व शौर्य कृषिसेवा केंद्राच्या संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल ऊर्फ राजू भगवंतराव गंधे (५०, रा. शिराळा) या शेतकऱ्याने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांनी शेतीत पेरणीकरिता भारत कृषिसेवा केंद्रातून १५ जून रोजी ३० किलोच्या २३,०३० रुपयांच्या १० बॅग तसेच १७ जून रोजी एक बॅग असे एकूण २६,०३० रुपयाचे सोयाबीन खरेदी केले होते.गावातील अन्य शेतकरी सूरज बोरकर यांनी १२ जून रोजी शौर्य कृषिसेवा केंद्रातून ८८०० रुपयांच्या सोयाबीन बियाण्याच्या चार बॅग विकत घेतल्या. याशिवाय नीलेश तऱ्हेकर यांनी तीन बॅग, राजेंद्र लव्हाळे यांनी १४ बॅग, कृष्णराव देवे यांनी आठ बॅग यांच्यासह तसेच अन्य शेतकऱ्यांनी दोन्ही कृषि केंद्रांतून लाखो रुपयांचे बियाणे विकत घेतले.खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले बियाणे जमिनीतून वर आलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम व परिश्रम वाया गेले. त्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी रीतसर पंचनामा केला होता. सदर कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी निकृष्ट बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भादंविचे कलम ४२०, सहकलम ७, १९ सीड्स अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल पांडुरंग दंडारे करीत आहेत.शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ज्या कंपनीचे बियाणे कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना विकले, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही यामध्ये आरोपी करण्यात येणार आहे.- आसाराम चोरमलेवरिष्ठ पोलीस निरीक्षक, वलगाव
शिराळा येथील दोन कृषिसेवा केंद्र संचालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST
पोलीस सूत्रांनुसार, शिराळा येथील भारत कृषिसेवा केंद्र व शौर्य कृषिसेवा केंद्राच्या संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल ऊर्फ राजू भगवंतराव गंधे (५०, रा. शिराळा) या शेतकऱ्याने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांनी शेतीत पेरणीकरिता भारत कृषिसेवा केंद्रातून १५ जून रोजी ३० किलोच्या २३,०३० रुपयांच्या १० बॅग तसेच १७ जून रोजी एक बॅग असे एकूण २६,०३० रुपयाचे सोयाबीन खरेदी केले होते.
शिराळा येथील दोन कृषिसेवा केंद्र संचालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा
ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिलीच घटना । बोगस बियाणे विक्री, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही