शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रवि राणांसह तिघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:05 IST

स्थानिक सह्याद्री कॉलनीतील "ओपन स्पेस"ला तारेचे कुंपण लावल्यामुळे पायवाट बंद झाली आणि दोन भागातील नागरिकांचा वाद रविवारी दुपारी उफाळून आला.

कुत्तरमारेंवर विनयभंगाचा आरोप : सह्याद्री कॉलनीतील जागेचा वादलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक सह्याद्री कॉलनीतील "ओपन स्पेस"ला तारेचे कुंपण लावल्यामुळे पायवाट बंद झाली आणि दोन भागातील नागरिकांचा वाद रविवारी दुपारी उफाळून आला. यानंतर झालेल्या मारहाण प्रकरणात अतिक्रमण निर्मुलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या तक्रारीवरून आ.रवि राणा यांच्यासह सचिन भेंडे व अन्य दोघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. यादरम्यानमहिलेच्या साडीचा पदर ओढून धक्काबुक्की करणे आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली राजापेठ पोलिसांनी कुत्तरमारेंविरूद्ध विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे. पोलीस सूत्रांनुसार गणेश कुत्तरमारेंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सचिन भेंडेला अटक केली आहे. तर आ. राणांचा याप्रकरणात कितपत सहभाग आहे, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. गायत्रीनगर ते सह्याद्री कॉलनी मार्गावरील उद्यानासाठी राखीव जागेवर महापालिकेने कुंपण घातले. याकुंपणामुळे काही नागरिकांना अडचण झाली तर काहींसाठी ते सोयीस्कर झाले. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी रविवारी आ. राणा सह्याद्री कॉलनीत गेले. त्याठिकाणी महापालिकेचे अधिकारीसुद्धा पोहाचले. दरम्यान नागरिकांचा रोष उफाळून आल्यानंतर अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या गणेश कुत्तरमारेंना मारहाण करण्यात आली. यामध्ये आ. रवि राणा यांनी धक्का देऊन खाली पाडले. त्यामुळे शासकीय कामकाजात व्यत्यत आणल्याचा आरोप कुत्तरमारेंनी तक्रारीतून केला आहे. कुत्तरमारेंच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आ. रवि राणांसह सचिन भेंडे व अन्य दोघांविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तर सह्याद्री कॉलनीत हा गोंधळ सुरू असताना एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करून तीच्या साडीचा पदर ओढून धक्काबुक्की केल्याचा आरोप कुत्तरमारेंवर करण्यात आला आहे. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी गणेश कुत्तरमारेंविरूद्ध भादंविच्या कलम ३५४, ३२३, २९४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. कुत्तरमारेंना निलंबित करामहिलेच्या विनयभंगाप्रकरणी गणेश कुत्तरमारे यांना तत्काळ अटक करुन निलंबित करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सोमवारी निवेदन देण्यात आले. कुत्तरमारे यांना त्वरित अटक करावी, त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, निलंबित करण्यात यावे, ही कारवाई एका तासात करावी, अन्यथा युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे यांनी दिला.