शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह प्रकरणी नवरदेवासह वऱ्हाडींविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : नजीकच्या पिंपळखुटा अर्मळ येथे बालविवाह प्रकरणी २५ वर्षीय नवरदेवासह वधूचेही आई-वडील व उपस्थित ३० ते ४० वऱ्हाडींविरुद्ध ...

अमरावती : नजीकच्या पिंपळखुटा अर्मळ येथे बालविवाह प्रकरणी २५ वर्षीय नवरदेवासह वधूचेही आई-वडील व उपस्थित ३० ते ४० वऱ्हाडींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. चाईल्ड लाईनच्या पुढाकाराने ही कारवाई मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस सूत्रांनुसार, पिंपळखुटा अर्मळ येथे अल्पवयीन मुलीचा मंगळवारी विवाह लावण्यात येत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या क्रमांकावर चाईल्ड लाईनचे सदस्य अजय देशमुख यांना १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाली. या माहितीवरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाईल्ड लाईनचे अजय देशमुख व पंकज शिनगारे तसेच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक .......... मगर, उपनिरीक्षक ............ जंगले, नायक पोलीस कॉन्स्टेबल अलका .......... , अमोल .............. यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी अल्पवयीन मुलीच्या घरापुढे मंडप टाकलेला होता. एक तासापूर्वी लग्न आटोपल्याचे पथकाला सांगण्यात आले. वधूने तिचे वय १७ वर्षे ३ महिने असल्याचे सांगितले. मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलीचे आई-वडील

शंकरराव चंपतराव आडे, सविता शंकरराव आडे तसेच ग्रामस्थ प्रवीण आडे (तिन्ही रा. पिंपळखुटा अर्मळ, जि. अमरावती), नवरदेव प्रदीप मनोहर राठोड (२५), त्याचे आई-वडील मनोहर देवलाल राठोड, सविता मनोहर राठोड (तिन्ही रा. भडशिवणी, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) व मांगीलाल चव्हाण (रा. माळेगाव) यांच्यासह घटनास्थळी असलेल्या ३० ते ४० नागरिकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या ९, १०, ११ सह भादंविचे कलम १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.