लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या जलजागृतीला प्रतिसाद देत क्रेडाई, अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्तांशी संवाद साधला. भूजल पुनर्भरणाबाबत १५ मे रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली.विविध भागात शोषखड्डे किंवा शास्त्रोक्त पद्धतीने जलपुनर्भरण या लोकचळवळीला बुधवारी क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी पाठिंबा व सक्रिय सहभाग दर्शविला. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाने आपल्या घरी, फ्लॅट सिस्टीममध्ये राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील भूजलस्तर वाढविण्यासाठी हे गरजेचे आहे. नवीन बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहेत तसेच जुन्या फ्लॅट सिस्टीमलाही ते बंधनकारक करण्यात आल्याचे आयुक्त संजय निपाणे यांनी सांगितले. क्रेडाईद्वारे १५ मे रोजी अभियंता भवनात सायंकाळी ५ वाजता जलपुनर्भरण या विषयावर नागरिकांमध्ये जागृतीसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पदाधिकाºयांनी दिली. यावेळी अध्यक्ष पंकज देशमुख, सचिव कपिल आंडे, संजय पर्वतकर, भूषण देशपांडे, राजन पांडे, नीलेश ठाकरे, सचिन वानखडे, लक्ष्मीकांत जोशी, धर्मेंद्र चंदेल, रवि बोरटे आदी उपस्थित होते.
जलपुनर्भरणाबाबत क्रेडाईचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:13 IST
महापालिकेच्या जलजागृतीला प्रतिसाद देत क्रेडाई, अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्तांशी संवाद साधला. भूजल पुनर्भरणाबाबत १५ मे रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली.
जलपुनर्भरणाबाबत क्रेडाईचा पुढाकार
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांशी संवाद : १५ मे रोजी कार्यशाळा; तज्ज्ञांचे मार्गदर्शन