शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीवर ठरणार ‘सीआर’, महापालिकांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 20:02 IST

मालमत्ता कर वसुलीच्या यशापयशावर संबंधित अधिकारी-कर्मचाºयांचा गोपनीय अहवाल (सीआर) ठरणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी करवसुलीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरीची तसेच कार्यवधीतील वसुलीच्या प्रमाणाची नोंद संबंधित अधिकारी-कर्मचा-यांनी स्वयंमूल्यांकन अहवालात करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.

अमरावती : मालमत्ता कर वसुलीच्या यशापयशावर संबंधित अधिकारी-कर्मचा-यांचा गोपनीय अहवाल (सीआर) ठरणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी करवसुलीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरीची तसेच कार्यवधीतील वसुलीच्या प्रमाणाची नोंद संबंधित अधिकारी-कर्मचाºयांनी स्वयंमूल्यांकन अहवालात करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.लोकसेवा समितीच्या २०१७-१८ च्या तेराव्या महाराष्टÑ विधानसभेच्या २८ व्या अहवालान्वये नागरी स्थानिक संस्थांनी वसूल करावयाचे मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांच्या विशेष वसुलीसंदर्भात संबंधितांच्या गोपनीय अहवालात नोंद करण्याबाबत शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या करांची वसुली व थकबाकीची नोंद संबंधित अधिकारी-कर्मचाºयांच्या गोपनीय अहवालात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकांमध्ये मालमत्ता कर व इतर करांच्या विशेष वसुलीची जबाबदारी करमूल्यनिर्धारक, संकलन अधिकारी, सहायक आयुक्त, सहायक क्षेत्रीय अधिकारी, एलबीटी अधीक्षक, बाजार परवाना अधीक्षक तसेच करलिपिकांवर आहे. यातील अनेक जण उत्कृष्ट काम करीत असतात, तर अनेक जण केवळ पाट्या टाकतात. त्या सर्वांचा लेखाजोखा आता गोपनीय अहवालात मांडला जाणार आहे. त्या गोपनीय अहवालावर संबंधितांची पदोन्नती, वेतनवाढ अवलंबून असणार आहे. 

असे आहेत निर्देशप्रतिवेदन अधिका-यांनी संबंधित करांच्या वसुलीचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास उत्कृष्ट करवसुलीची नोंद संबंधितांच्या कार्यमूल्यांकन तथा गोपनीय अहवालात करावी तसेच करांच्या वसुलीचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्याची स्पष्टपणे नोंद करून कामाच्या एकत्रित मूल्यांकनासाठी त्याचा अवश्य विचार करावा.

पुनर्विलोकन अधिका-यांनी योग्य कार्यवाही झाली असल्याची खातरजमा करून कार्यमूल्यांकन करावे. मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांच्या विशेष वसुलीसंदर्भात संबंधितांनी नोंद न केल्यास प्रतिकूल कामगिरीबाबत शेरा नमूद करण्याचे निर्देश नगरविकासने दिले आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती